अभिनेत्री भारती सिंग विरोधात मुरबाड पोलिसांत उपसभापती अरूणा रघुनाथ खाकर यांची तक्रार
उपसभापती अरूणा रघुनाथ खाकर यांनी अभिनेत्री भारती सिंग विरोधात मुरबाड पोलिसांत तक्रार दाखल केली....
अभिनेत्री भारती सिंग विरोधात मुरबाड पोलिसांत उपसभापती अरूणा रघुनाथ खाकर यांची तक्रार
कलर्स (HD) चँनेलवरील वरील खतरा खतरा या एका टिव्ही शोमध्ये अभिनेत्री भारती सिंग हिने संपूर्ण आदिवासी समाजाला उद्देशून जातिवाचक आक्षेपार्ह वक्तव्य करत गैरकृती केल्याविरोधात उपसभापती अरूणा रघुनाथ खाकर यांनी भारती सिंग विरुध्द पोलीसात तक्रार दाखल केली आहे.
कलर्स (HD) चँनेलवरील शोमध्ये संपूर्ण आदिवासी समाजाला उद्देशून विचित्र अंगविक्षेप करत जातिवाचक अपशब्द वापरत समाजाची चेष्टा केली आहे, आदिवासी समाजातर्फे त्यांच्या या कृत्याला आम्ही सर्व आदिवासी समाज म्हणून जाहीर निषेध करतो भारती सिंग हिच्या या गैरकृत्यामुळे आदिवासी समाजा मध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे, आदिवासी समाजाला जातिवाचक अपशब्द बोलून आदिवासी समाजाचा अपमान करणे, जातिवाचक बोलून आदिवासी समाजाच्या भावना दुखावणे असा गैरप्रकार जाणिवपूर्वक केला आहे. तरी भारती सिंग यांच्या कलर्स (HD) टीव्ही वरील शो कायमस्वरूपी बंद करण्यात यावा तसेच भारती सिंग व कलर्स चँनेवर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी ,अशी माहिती तक्रारारीद्वारे उपसभापती अरूणा खाकर यांनी दिली आहे. यावेळी आदिवासी लोकसेवा संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ खाकर, मुरबाड कृषी उत्पन्न बाजर समीती संचालक अनिल कवटे, सरपंच भारती शिद, सरपंच नारायण सावळा, सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ उघडे, पांडू शिद यावेळी उपस्थितीत होते.
मुरबाड
प्रतिनिधी - लक्ष्मण पवार
______
Also see : भारती सिंग वर अँट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
https://www.theganimikava.com/Demand-for-filing-of-antrocity-case-against-comedian-Bharti-Singh