नागरिकांचे बळी घेतलेल्या खड्यांकडे महापालिकाचे दुर्लक्ष
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याने नागरिकांना या खड्ड्यांमधून मार्ग काढवा लागत आहे
नागरिकांचे बळी घेतलेल्या खड्यांकडे महापालिकाचे दुर्लक्ष
नगरसेवकाने स्वखर्चाने बुजविले खड्डे
कल्याण (Kalyan): कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याने नागरिकांना या खड्ड्यांमधून मार्ग काढवा लागत आहे. विशेष म्हणजे ज्या मलंगगडवरील रस्त्याच्या खड्याने गेल्या वर्षी तीन बळी घेतले. त्याच खड्डयांनी पुन्हा डोकेवर काढले आहे. त्यातच महानगरपालिकेला वारंवार पत्रव्यवहार करून देखील खड्डे न बुजविल्याने अखेर नगरसेवक कुणाल पाटील यांनी स्वखर्चाने हे खड्डे बुजवून महापालिका प्रशासनाचा निषेध केला आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील बहुतांश रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच कल्याण शीळ रोड, मलंग रोड, पत्रिपुलासह मुख्य रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊन एक एक तास वाहतूक कोंडीत शेकडो वाहने अडकून पडत आहेत. मात्र याबाबत वारंवार तक्रारी करून देखील पालिका प्रशासन लक्ष देत नाही. कल्याण मलंग रोडवरील खड्ड्यामुळे गेल्याच वर्षी ३ जणांचा बळी गेला, तर अनेक लहान मोठे अपघात होत आहे. त्यानंतरही पालिकेचं दुर्लक्ष असल्याचा आरोप नगरसेवक कुणाल पाटील यांनी केला आहे.
विशेष म्हणजे खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने सुमारे १५ कोटी रुपयांच्या निधींची तरतूद केली आहे. मात्र काही दिवसापूर्वीच २७ गावातील १८ गावे वगळ्यात आल्याने या परिसरात यापूर्वी महापालीकेने नागरी विकास कामे ठेकेदारांच्या माध्यमातून सुरु केली होती. मात्र सर्वच विकास कामे आता अर्धवट सोडल्याने या परिसरात नागरी समस्या अधिकच वाढल्या आहेत.
दरम्यान, कल्याण पूर्वेतील द्वारली ते श्री मलंगगड रोड बाबत मी नेहमीच आग्रही भूमिका घेतलेली आहे. या रोडवर सततची होणारी वाहतूक तसेच या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात व त्यात निष्पाप लोकांचे बळी ही खूपच दुःखत घटना कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनासाठी म्हणता येईल, वारंवार तक्रारी करून देखील रस्त्याचे काम केले जात नाही. त्यामुळे मी स्वतः नागरिकांच्या सह्याने व स्वखर्चाने प्रशासनाचा निषेध नोंदवत खड्डे भरण्याचे काम चालू केले असून आता तरी पालिका प्रशासनाला जाग येऊन सर्व रस्ते खड्डे मुक्त होतील अशी अपेक्षा नगरसेवक कुणाल पाटील यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीशी संर्पक साधला असता खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे. निधीची कमतरता नाही, असे सांगितले आहे. मात्र निधी आहे, तर खड्डे बुजवून नागरिकांना होणारा त्रास का कमी केला जात नाही? असा सवाल यामुळे उपस्थित केला जात आहे.
कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
______
Also see : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा इशारा
https://www.theganimikava.com/Student-fees-waived-statement-given-to-colleges-and-university