महापालिका आयुक्तांची रुग्णालयाला अचानक भेट
महापालिका आयुक्तांची ठाणे कोविड सेंटरच्या रुग्णालयाला अचानक भेट: आयसीयु युनिटची केली तपासणी

महापालिका आयुक्तांची ठाणे कोविड सेंटरच्या रुग्णालयाला अचानक भेट: आयसीयु युनिटची केली तपासणी
ठाणे (thane) महापालिकाआयुक्त डॉ.बिपीन शर्मा यांनी आज अचानक महानगरपालिकेच्या ठाणे कोविड (covid) हॉस्पिटला भेट देऊन रुग्णालय व्यवस्थापन तसेच वैद्यकीय व्यवस्थापनाचा आढावा घेतला. दरम्यान त्यांनी येथील आयसीयु (icu) युनिटची तपासणी करून तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला.
आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास महानगरपालिका आयुक्त डॉ. बिपिन शर्मा यांनी ठाणे कोविड रुग्णालयात अचानक भेट देऊन तेथील डॉक्टर याच्याशी बोलून वैद्यकीय व्यवस्थापण कशा पद्धतीने सुरू आहे. तसेच उपायुक्त (आरोग्य) विश्वनाथ केळकर यांच्या कडून सर्वसाधारण रुग्णालय व्यवस्थापनाची माहिती घेतली. यावली रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर माळगावकर उपस्थित होते दरम्यान यावेळी महापालिका आयुक्तांनी रुग्णालयाच्या आयसीयू युनिट ची तपासणी करून आय सी यू (icu) युनिट मध्ये किती रुग्ण उपचार घेत आहेत आणि किती बेड उपलब्ध आहेत. याचा आढावा घेतला तसेच या ठिकाणी उपचारासाठी येणार्या रुग्णांची कुठलीही गैरसोय झाल्याची तक्रार आल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल असा इशाराही महापालिका आयुक्तांनी यावेळी बोलतांना दिला यावेली अतिरिक्त आयुक्त संजय हेरवडे उपस्थित होते.
ठाणे
प्रतिनिधी - सत्यवान तरे
_____
Also see: नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उद्घाटन