मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी युसूफ मेमनचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन.

युसूफ हा 1993 साली झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी.

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी युसूफ मेमनचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन.
Mumbai Bomb blast

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी युसूफ मेमनचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन.

मुंबई | नाशिक मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या युसूफ मेमन यांचे निधन. युसूफ हा 1993 साली झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी. दहशतवादी टायगर मेमनचा भाऊ युसूफ मेमनचा हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू.

नाशिक मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या युसूफ मेमनला अचानक छातीत दुखण्याची तक्रार आल्यानंतर त्याला तुरूंगातील दवाखान्यात नेण्यात आले. त्याला नाशिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी आता त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे. अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूच्या खर्‍या कारणाचे निकष मिळू शकते. पोलिसांनी त्याच्या घरातील सदस्यांनाही कळविल्याचे सांगितले जात आहे.त्याचा एक भाऊ इशाक मेमन हा देखील नाशिक तुरूंगात शिक्षा भोगत आहे.

विशेष म्हणजे १२ मार्च १९९३ ला  मुंबईतल्या १२ जागेवर बॉम्बस्फोटांची मालिका झाली होती, त्यामध्ये २७७ लोक ठार आणि १३१ लोक जखमी झाले होते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नरसी नाथ स्ट्रीट, शिवसेना भवन, सेंचुरी बाजार, माहीम, झवेरी बाजार, सी रॉक हॉटेल, प्लाझा सिनेमा, जुहू सेंटौर हॉटेल, सहारा विमानतळ आणि विमानतळ सेंटॉर हॉटेल अशा चार ठिकाणी हे स्फोट घडले. दोन तासात १३ बॉम्बस्फोटांमध्ये तब्बल २७ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. या प्रकरणात, ४ नोव्हेंबर १९९३ रोजी,१०,००० पृष्ठांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते, ज्यामध्ये १७९ लोकांना आरोपी करण्यात आले होते. या स्फोटांमध्ये दाऊद इब्राहिमला मुख्य आरोपी बनविण्यात आले होते, परंतु अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. २००६ मध्ये मुंबईत स्फोटांसाठी दोषी ठरलेल्यांमध्ये दाऊदशिवाय टायगर मेमन, याकूब मेमन, युसुफ मेमन यांचा समावेश होता. या स्फोट प्रकरणात दोषी ठरलेल्या मुस्तफा दौसाचा २०१७ साली मुंबईतील रूग्णालयात मृत्यू झाला, तर याकूब मेमनला फाशी देण्यात आली.

____________________