श्री.आकाश भाऊसाहेब बोडके  यांची भाजपा पिंपरीचिंचवड शहर जिल्हा युवामोर्चा उपअध्यक्ष पदी निवड ...

पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या उपअध्यक्ष पदी श्री.आकाश भाऊसाहेब बोडके  यांची नियुक्ती करण्यात आली आहे...

श्री.आकाश भाऊसाहेब बोडके  यांची भाजपा पिंपरीचिंचवड शहर जिल्हा युवामोर्चा उपअध्यक्ष पदी निवड ...
Mr. Akash Bhausaheb Bodke elected as Vice President of BJP Pimpri Chinchwad City District Youth Front

श्री.आकाश भाऊसाहेब बोडके  यांची भाजपा पिंपरीचिंचवड शहर जिल्हा युवामोर्चा उपअध्यक्ष पदी निवड ...

पुणे पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या उपअध्यक्ष पदी श्री.आकाश भाऊसाहेब बोडके  यांची नियुक्ती करण्यात आली आहे.भाजप (bjp) युवा मोर्चच्या वतीने आयोजित करण्यात  आलेल्या कार्यक्रमात शहर अध्यक्ष आमदार महेश दादा लांडगे,आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे यांच्या हस्ते  श्री.आकाश भाऊसाहेब बोडके  यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या वेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष संकेत चोंधे, महिला अध्यक्ष उज्वला गावडे, सत्तारुढ पक्ष नेते नामदेव ढाके , सदाशिव खाडे, राजेश पिल्ले, नगरसेवक मोरेश्वर शेंडगे, स्वीकृत नगरसेवक  विठ्ठल भोइर,विनोद तपकीर, दिनेश खाडे वैशाली खाडे, पांडा भाऊ भालेकर, यांच्या सह पक्षातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निवडीबद्दल बोलतांना श्री.आकाश भाऊसाहेब बोडके म्हणाले की मागील आठ ते दहा वर्षापासून आमदार महेश दादा लांडगे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली  भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठपने काम केलेल्या कार्याचे हे फळ आहे शहर अध्यक्ष  आमदार महेश दादा लांडगे व आमदार लक्ष्मण जगताप यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थ करून दाखवण्यासाठी अहोरात्र जनसेवा करणार आहे असे  श्री.आकाश भाऊसाहेब बोडके यांनी निवड झाल्यानंतर सांगितले.

वाकड गावामधील  उपमहाराष्ट्र केसरी विशाल आप्पा कलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी सोबत समाजोपयोगी काम करत होतो पण आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्याकडून खरंतर माझ्यासाठी सरप्राईज होतं भाऊंनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला कुठेही तडा न जाता येणाऱ्या काळात पिंपरी चिंचवड शहरात युवकांच्या माध्यमातून जास्तीत जास्त चांगलं काम उभ करून भारतीय जनता पार्टी पक्ष वाढीस जास्त प्राधान्य देऊन आणि आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचे हात अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

वार्ता संकलन -
   श्री बाळासाहेब सूळ 
  वाकड विभाग अध्यक्ष
      आत्माराम काळे सचिव, 
      ज्ञानेश्वर तावरे कार्य अध्यक्ष, 
      वाकड पिंपरी चिंचवड पुणे

पिंपरी, पुणे

प्रतिनिधी - आत्माराम काळे 

_________

Also see :शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याबाबत मा. जिल्हाधिकारी पुणे यांना युक्रांद चे निवेदन

https://www.theganimikava.com/Regarding-withdrawal-of-anti-farmer-laws-Hon-Statement-of-Ukraine-to-Collector-Pune