WHO कडून मॉडर्ना लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता

अमेरिकेच्या या लस उत्पादकाशिवाय डब्ल्यूएचओने आतापर्यंत आपात्कालीन अ‍ॅस्ट्रॅजेनेका, फायझर-बायोनटेक, जॉन्सन अँड जॉन्सन लसींचा आणीबाणी वापरण्यास परवानगी दिलीय.

WHO कडून मॉडर्ना लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता
Moderna Vaccine news

WHO कडून मॉडर्ना लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता

Emergency use of modern vaccine approved by WHO

अमेरिकेच्या या लस उत्पादकाशिवाय डब्ल्यूएचओने आतापर्यंत आपात्कालीन अ‍ॅस्ट्रॅजेनेका, फायझर-बायोनटेक, जॉन्सन अँड जॉन्सन लसींचा आणीबाणी वापरण्यास परवानगी दिलीय. 

जागतिक आरोग्य संघटनेने मॉडर्नाच्या कोविड 19 या लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिलीय. अमेरिकेच्या या लस उत्पादकाशिवाय डब्ल्यूएचओने आतापर्यंत आपात्कालीन अ‍ॅस्ट्रॅजेनेका, फायझर-बायोनटेक, जॉन्सन अँड जॉन्सन लसींचा आणीबाणी वापरण्यास परवानगी दिलीय. 

WHO ने असे म्हटले आहे की, येत्या काही दिवसांत चीनच्या सिनोफार्मा आणि सिनोवाक लसींनाही अशीच परवानगी दिली जाऊ शकते. मुख्य कार्यकारी अधिकारी  स्टीफन बॅन्सेल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 1 मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेने  कित्येक महिन्यांच्या प्रतीक्षानंतर शुक्रवारी मॉडर्ना लसीला आपत्कालीन वापरास ग्रीन सिग्नल दिलाय.

तसेच याच्या आणीबाणीसाठी वापरास मंजुरी दिलीय. अमेरिकेच्या या लस उत्पादकाशिवाय डब्ल्यूएचओने आतापर्यंत आपात्कालीन अ‍ॅस्ट्रॅजेनेका, फायझर-बायनटेक आणि जॉन्सन अँड जॉन्सन लसींच्या आणीबाणी वापरास परवानगी दिली. येत्या काही दिवसांत चीनच्या सिनोफार्मा आणि सिनोवाक लसींनाही अशीच परवानगी दिली जाऊ शकते.

 कंपनीने जागतिक आरोग्य संघटनेला डेटा देण्यास उशीर केल्यामुळे कित्येक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी मॉडर्ना लसीला ग्रीन सिग्नल देण्यात आला. ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर, व्हेंटिलेटर्सच्या तुटवड्याला भारताला सामोरं जावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फोन वरुन चर्चा झाली आहे.

जो बायडन यांनी भारताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर अमेरिकेचे संरक्षण सचिव ब्लिंकेन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अमेरिकेतील 135 कंपन्यांचे सीईओंनी भारताला मदत करण्यासाठी तयार असल्याचं जाहीर केलं होतं.

भारताला कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती मदत करण्यासाठी तयार असल्याची माहिती अमेरिकेतील 135 सीईओंनी दिली. यूपीएस, यूनायटेड डेल्टाकडून स्वंयसेवी तत्वावर व्हेंटिलेटर्स पाठवली जाणार आहेत. ज्याचं वितरण अ‌ॅमेझॉनकडून करण्यात येईल.

गुगल, आयबीएम, जे.पी.मोर्गन, नुवीन लॅब्स, फेडेक्स वॉलमार्ट, कोक, जॉन्सन अँड जॉन्सन , फायझर यांना भारतातील परिस्थितीचा जगाच्या आरोग्य व्यवस्थेवर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, याची जाणीव आहे.

अमेरिका भारताला मिलिटरी मोबाईल हॉस्पिटल आणि आयसीयू पाठवणार आहे