मुरबाड म्हसा येथेआखिल भारतीय  ओबीसी महासभेची मिटिंग संपन्न 

भारतीय राज्यघटनेनुसार स्वतंत्र भारतातील प्रत्येक नागरिकाला आपले मूलभूत अधिकार अंगीकृत व आपले बहुमत, विचार मांडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.

मुरबाड म्हसा येथेआखिल भारतीय  ओबीसी महासभेची मिटिंग संपन्न 
Meeting of All India OBC General Assembly held at Murbad Mhasa

मुरबाड म्हसा येथेआखिल भारतीय  ओबीसी महासभेची मिटिंग संपन्न 
 
  भारतीय (india) राज्य घटनेनुसार स्वतंत्र भारतातील(independent india) प्रत्येक नागरिकाला आपले मूलभूत अधिकार अंगीकृत व आपले बहुमत, विचार मांडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तसेच obc/ Sc/St समाजातील लोकांना आपले मूलभूत संविधानिक अधिकार मिळवून देण्यासाठी ललित कुमार लोधी यांनी 1999 सालापासून ओबीसी समाज व महात्मा फुले, शाहू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चळवळीसाठी संपूर्ण आयुष्य झोकुन देऊन अखिल भारतीय ओबीसी महासभेची स्थापना केली आहे. या संघटनेची बांधणी जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) पासून ते कन्याकुमारी (Kanyakumari) पर्यंत जोमाने सुरू असून महाराष्ट्र (maharashtra) राज्याचे (state) अध्यक्ष ऍड.रघुनाथ महाले मुरबाड तालुक्यातील म्हसा येथे आले असता आयोजित आखिल भारतीय ओबीसी महासभेच्या महत्वपूर्ण मीटिंगमध्ये बोलताना सांगितले की, ही संघटना फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचली आहे. ही संघटना युनायटेड नेशन वर जागतिक स्तरावर काम करणारी संघटना असून ओबीसी वर्गाच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणाऱ्या सरकार विरोधात रस्त्यावर उतरून काम करणारी संघटना आहे. असे यावेळी महासभेच्या मीटिंगमध्ये बोलताना सांगितले.

 यावेळी त्यांच्यासोबत ओबीसीचे महाराष्ट्र (maharashtra) राज्याचे युवा नेतृत्व सुधाकर पाटील साहेब, विभागीय अध्यक्ष राजाराम ढोलमसाहेब, ठाणे जिल्हाध्यक्ष धनाजी सुरोसेसाहेब, विशेष उपस्थिती म्हणुन  राजेश पवार साहेब, चेअरमन निर्मिक फाउंडेशन (Chairman Nirmik Foundation) हे उपस्थित होते.यावेळी आखिल भारतीय ओबीसी महासभेच्या मुरबाड तालुका अध्यक्षपदी अनिल घुडे यांची नियुक्ती करून संघटना वाढीसाठी व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

भिवंडी (ठाणे )

प्रतिनिधी - सत्यवान तरे

________

Also see: निवासी इमारत कोसळल्याने 18 तासांहून अधिक काळ बचावकार्य सुरू 

https://www.theganimikava.com/raigad-building-collapse-rescue-operation-is-still-being-carried