वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करून अटक करा- भाजपा जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील 

वाडा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव यांच्या गैरवर्तणुकी बाबत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी यासाठी  भाजपा पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी मागणी केली आहे.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करून अटक करा- भाजपा जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील 
Medical Superintendent Dr. Arrest Pradip Jadhav by suspending him- BJP District President Nandkumar Patil

वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करून अटक करा- भाजपा जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील 

 

वाडा :  वाडा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव यांच्या गैरवर्तणुकी बाबत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी यासाठी  भाजपा पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी मागणी केली आहे.
     डॉ. प्रदीप जाधव सारखा  अधिकारी आरोग्याशी संबधित असणाऱ्या या क्षेत्राला बदनाम करण्याच काम या कृत्यातुन केले आहे.आज देशांत महिंलासाठी भयमुक्त वातावरणा साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार काम करत असताना अश्या प्रकारचं कृत्य आरोग्य खात्यातील पदाधिकारी यांनी आपल्याच खात्यातील महिला कर्मचाऱ्यांचा  लैंगिक छळ करणे व कामावर असताना दारू पिण्यासारखे अतिशय घाणेरडे कृत्य करणाऱ्या या अधिकाऱ्याला तात्काळ अटक करून निलंबित करावे यासाठी नंदकुमार पाटील यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिले आहे.
       सदर या प्रकरणावर येत्या काही दिवसात कारवाई झाली नाही तर जिल्हाधीकारी कार्यालयावर भाजप कडून धडक मोर्चा काढण्यात येईल तसेच डॉ.प्रदीप जाधव यांना पाठीशी घालणाऱ्या पालघर जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.कांचन वानेरे यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी भाजपा तर्फे करण्यात आली आहे.

वाडा

प्रतिनिधी - जयेश घोडविंदे

__________

Also see :

https://www.theganimikava.com/Shiv-Senas-welfare-agitation-in-the-east-to-protest-the-Hathras-incident