मराठा आरक्षण व गोंधळलेला मराठा तरुण....

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं 9 सप्टेंबर 2020 रोजी तूर्तास स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीमध्ये आरक्षण मिळणार की नाही ?

मराठा आरक्षण व गोंधळलेला मराठा तरुण....
Maratha reservation and confused Maratha youth

मराठा आरक्षण व गोंधळलेला मराठा तरुण....

पुणे पिंपरी : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं 9 सप्टेंबर 2020 रोजी तूर्तास स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीमध्ये आरक्षण मिळणार की नाही ?
यातून  केंद्र व राज्य सरकार काही मार्ग काढणार की नाही या गोंधळलेल्या मानसिकतेमध्ये सद्या मराठा तरुण आहे.

मराठा नेते, मराठा मोर्चातील समन्वयक आपल्या वेगवेगळ्या भूमिका मांडत असल्याने मराठा तरुणांच्या गोधळात आणखी भर पडली आहे.मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समनव्यक तीन पर्याय समाजापुढे मांडत आहे..एक गट म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण ओबीसी कोट्यातून मिळण्यासाठी प्रयत्न करावेत आणि दुसरा गट म्हणतो सद्या लागू झालेलं EWS (economically Weaker section)चे आरक्षण पदरात पाडून घ्यावं,आणि तिसरा वर्ग म्हणतो की SEBC चे आरक्षणची वाट बघावी तोपर्यंत Ews सारखे आरक्षण घेऊ नये, Ews आरक्षण घेतलं तर सर्वोच्च न्यायालयातिल खटल्यावर परिणाम होईल.

मराठा नेत्यानी मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं हा एक पर्याय सुचवला आहे.मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी व अस आरक्षण जर दिले सामाजिक संघर्ष होण्याची दाट शक्यता असल्याने हा पर्याय कोणताही राजकीय पक्ष निवडणार नाही.

ओबीसी समाज 52 टक्के आहे केंद्रात ओबीसीला 27 टक्के व महाराष्ट्र राज्यात 19 टक्के आरक्षण आहे.तुलनेने 52 टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसी ला अगोदरच कमी आरक्षण आहे.त्यामुळे ओबीसी समाज मराठा समाजाला ओबीसी मध्ये अंतर्भूत करण्यास विरोध करेल.कुणबी(मराठा) यांचा सामावेश अगोदरच ओबीसी मध्ये आहे.म्हणजे राज्यात 19 टक्के व केंद्रातील 27 टक्के पैकी काही वाटा कुणबी समाजाच्या रूपाने मराठ्यांना अगोदरच मिळत असल्याने ओबीसी आणखी मराठा समाज त्यात अंतर्भूत करायला विरोध करेल.

ओबीसी दुखावला जाऊ नये व वोट बँक ची नाराजी ओढवू नये म्हणुन मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्याचा पर्यायाबाबत राजकीय पक्ष अनुकूल दिसत नाहीत.

दुसरा पर्याय काही नेत्यानी सांगितला की मराठ्यांनी सद्या Ews मध्ये आरक्षण घ्यावे म्हणजे तूर्तास केंद्र व राज्यात याचा फायदा मराठा समाजाला होईल.Ews चे 12 जानेवारी 2019 रोजी 10 टक्के जे आरक्षण केंद्र सरकारने दिले त्याची अट अशी आहे की SC ST OBC व सद्या आरक्षण ज्यांना मिळाले नाही अश्या आर्थिक दुर्बळ घटकाला हे 10 टक्के आरक्षण आहे.
Ews चा पर्याय निवडला तर तांत्रिक दृष्टया SEBC आरक्षण वर कोर्टात याचा परिणाम होण्याची शक्यता वाटते..

तिसरा मतप्रवाह असा आहे की मराठा समाजाने EWS आरक्षण चा पर्याय न निवडता SEBC न्यायालयिन लढाई लढावी व तोपर्यंत वाट बघावी.पण तस केलं तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2020 -21 मध्ये शैक्षणिक व नोकरीत आरक्षण पासून वंचित राहावे लागेल.

वरील गोंधळ मराठा तरुणांच्या मनात चालू असतांना मराठा तरुण प्रचंड अश्या निराशेत आहे.मराठा मोर्चा वेळी एकजुटीने दिसत असलेले मराठा समनव्यक आज मात्र विविध पक्षाचा राजकीय अजेंडा चालवत असल्याचे दिसून येते.अशा प्रकारच्या अजेंडामुळे प्रत्येकजण वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत त्यामुळे मराठा तरुणाच्या गोंधळात आणखी भर पडली आहे.
हा मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा हीच मराठा तरुण अपेक्षा करत आहेत.

माझ्या सारख्या मराठा तरुणाला कायद्याचा सखोल अभ्यास नाही.मराठा तरुणाच्या मनात आज जो मराठा आरक्षण बाबत जी अनिश्चितता,गोंधळ चालला आहे तो मांडण्याचा इथं प्रयत्न..

एक मराठा लाख मराठापिंपरी, पुणे
प्रतिनिधी - आत्माराम काळे

_________

Also see : स्वदेशी बनावटीच्या लेझर गाईडेड रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी करण्यात केली...

https://www.theganimikava.com/Indigenous-laser-guided-anti-tank-missiles-were-successfully-tested-today