मराठा आरक्षण रद्द प्रकरणी राज्यभरातून विविध प्रतिक्रिया

आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे राज्यभरातून नेते, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, आंदोलनकर्ते आदींच्या प्रतिक्रिया येत आहेत.

मराठा आरक्षण रद्द प्रकरणी राज्यभरातून विविध प्रतिक्रिया
Maratha reservation

मराठा आरक्षण रद्द प्रकरणी राज्यभरातून विविध प्रतिक्रिया

Various reactions from across the state in the case of cancellation of Maratha reservation

 आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे राज्यभरातून नेते, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, आंदोलनकर्ते आदींच्या प्रतिक्रिया येत आहेत.

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यात अंधार निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द होणं हे महाविकास आघाडीचं अपयश आहे. न्यायालयाच्या सुनावण्यांना वकिल हजर नसणे, कागदपत्र उपलब्ध नसणे अशा बेजबाबदार पद्धतीने ही केस हातळण्यात आली.

त्यामुळे ठाकरे सरकाने कोरोना आणि मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवावं. सर्वपक्षीय बैठक घ्यावी, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय आणि निराश करणारासर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सखोल अभ्यास करून राज्य सरकार पुढील भूमिका निश्चित करेलसर्वोच्च न्यायालयाने मराठा बांधवांना जे नाकारले, त्याची भरपाई राज्य सरकार सर्वतोपरीने करून देणार.

आघाडी सरकारने मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजची घोर फसवणूक केली आहे. देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री असताना आम्ही विधानसभेत कायदा केला. मागासवर्गीय आयोग नेमला, सर्व तांत्रिक बाजू पूर्ण करून आरक्षणाचा प्रश्न संपवला होता.  

आरक्षणासंदर्भात या सरकारमध्ये कुठेही एक वाक्यता नव्हती तीन पक्षाची वेगवेगळी मते होती. तिन्ही पक्षाची नेते भांडत होती. यांच्या मनात मध्येच हे आरक्षण व्हावं अस कधीच वाटत नव्हतं. म्हणून नियोजनाचा अभाव, समन्वयाचा अभाव, तिन्ही पक्षांच्या वाद विवाद आणि विसंवादामुळे हे आरक्षण टिकवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.

मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने अहमदनगरमधील मराठा नेत्यांमध्ये नाराजी... येत्या 8 मे नंतर जिल्ह्यात प्रत्येक गावात बंद करून करणार आंदोलनमराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक संभाजी दहातोंडे यांचा इशारादेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा नेत्यांना विचारात घ्यायचे ते या सरकारने केले नाही...
त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात करणार आंदोलन करणार असल्याचे दिला इशारा.

मराठा आरक्षण बाबतचा निर्णय हा मराठा समाजाच्या मुळावर घाला घालणारा आहे. मराठा समाज हा दुःखाच्या खाईत गेला आहे. राजकारघटनेतील समानतेचा शब्दावर विश्वास राहिला नाही. केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत आहे . मराठा समाज यापुढे कोणत्याही पक्षाच्या हातचे बाहुले होणार नाहीत. फक्त मराठा समाजा साठी स्वतंत्र मराठा पक्षाची स्थापना करण्यात येणार, तशी आम्ही घोषणा करत आहोत.

मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला याचं वाईट वाटतं. आरक्षण मिळाले असते तर त्याचा फायदा झाला असता. मात्र आता सत्तेत असणाऱ्या आणि विरोधी पक्षात असणाऱ्यांनी एकत्र येऊन समाजातील युवा वर्गाचा हिताचा विचार करावा. आता यांच्यात कोणीही राजकारण करू नये. शेवटी कोर्टाचा निकाल हा कोर्टाचा निकाल असतो.

मराठा समाजाचा आरक्षण तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आरक्षण या सरकारला टिकवता आला नाही याला सर्वस्वी जबाबदार महाविकास आघाडी सरकारचा आहे.