सुनील माने आणि शिवसेना कनेक्शनची चौकशी करा

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सुनील माने यांच्या शिवसेना कनेक्शनची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

सुनील माने आणि शिवसेना कनेक्शनची चौकशी करा
Mansukh Hiren murder

सुनील माने आणि शिवसेना कनेक्शनची चौकशी करा

Inquire about Sunil Mane and Shiv Sena connection

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सुनील माने यांच्या शिवसेना कनेक्शनची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सुनील माने यांच्या शिवसेना कनेक्शनची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. भातखळकर यांनी तसे पत्रच एनआयएच्या महासंचालकांना लिहिलं आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सुनील माने यांचे बरेच नातेवाईक हे शिवसेनेत सक्रिय असून त्यांची बहीण व त्या बहिणीचे पती हे तर शिवसेनेचे नगरसेवक होते. तसेच सुनील माने यांचा शिवसेनेच्या नेत्यांशी सुद्धा जवळचा संबंध असल्याने त्यांच्या शिवसेना कनेक्शनची सखोल चौकशी करण्याची करण्यात यावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

मनसुख हिरेन यांना पोलीस अधिकारी तावडे या नावाने कॉल करून घराबाहेर बोलविल्या प्रकरणी अटक करण्यात आलेले सुनील माने यांचे शिवसेना कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुनील माने यांची बहीण ही मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथून नगरसेविका होती तर सुनील माने यांच्या बहिणीचे पती हे तर शिवसेनेकडून चार वेळा नगरसेवक होते.

इतकेच नव्हे तर सुनील माने यांचा सख्खा भाऊ व त्यावेळी नगरसेवक असलेले त्याच्या बहिणीचे पती यांनी पत्रा चाळीतील नागरिकांना घरे रिकामी करण्यासाठी दमदाटी करण्याचा प्रकार केला होता. त्यात सुनील माने यांचा सुद्धा सहभाग होता. तसेच पीएमसी बँक घोटाळ्यात ज्या शिवसेना नेत्यांना कर्ज मिळाली त्यांच्याशी सुद्धा माने यांचा जवळचा संबंध होता.

त्यामुळे मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी करताना माने यांच्या शिवसेना कनेक्शनची सुद्धा चौकशी होऊन ‘दूध का दूध और पानी का पानी’ होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच मी एनआयएला पत्र लिहून ही मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितलं.

सुनील मानेच्या मोबाईलमधून एक मॅप एनआयएच्या हाती लागला आहे. हा नकाशा प्रियदर्शनी पार्क, चेंबूर ते अँटेलिया परिसरापर्यंतचा आहे, अशी माहितीही एनआयएने दिली. या मॅपमध्ये जो रुट आहे, त्याच मार्गावरुन 24 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी अँटिलिया परिसरात आणून पार्क करण्यात आली होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनील मानेने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्याचे अनेक पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत.

दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये गेल्या महिन्यात सुनील माने यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला होता. आता सुनील मानेंना एनआयएने अटक केली आहे.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांची पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांशी बोलताना यासंबंधी दावा केला होता. आपल्या पतीला कांदिवली क्राईम ब्रांचमधून फोन आला होता, आणि चौकशीसाठी बोलावलं होतं, असं त्यांनी सांगितलं होतं.

मनसुख हिरेन यांची हत्या घडली त्या रात्री नेमकं काय घडलं? याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. निलंबित पोलीस कर्मचारी विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोघांच्या चौकशीतून एटीएसच्या हाती अनेक पुरावे आले आहेत. त्याशिवाय एटीएसने सचिन वाझेंचं लोकेशन तपासलं आणि मोबाईल टॉवर आणि आयपीचं मूल्यांकनही केलं होतं. तसेच अनेक गाड्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवल्या होत्या. त्यातून काही गोष्टी समोर आल्या आहेत.

त्या रात्री आरोपींनी हिरेन यांच्या नाकावर जबरदस्ती क्लोरोफॉर्म टाकण्यात आलं. त्यामुळे हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांची हत्या केल्याचं सूत्रांनी सांगितलं. पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार हत्येपूर्वी हिरेन यांच्या चेहऱ्यावर मार लागलेला होता. त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मार लागलेला होता.

मृत्यूपूर्वी हा मार लागलेला होता. तसेच त्यांच्या अंगावर काही ठिकाणी मार होता. विशेषत: डोक्यालाही मार लागलेला होता.