मनीषा वाल्मिकी’ हत्या व अत्याचार निषेधार्थ मेणबत्ती मार्च शांततेत संपन्न....

उत्तर प्रदेश च्या हाथरस जिल्ह्यातील चंद्रप्पा परिसरातील १९ वर्षीय मनीषा वाल्मीक युवर १४ सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करून तिची जिभ कापून मनका तोडण्यात आला...

मनीषा वाल्मिकी’ हत्या व अत्याचार निषेधार्थ मेणबत्ती मार्च शांततेत संपन्न....
मनीषा वाल्मिकी’ हत्या व अत्याचार निषेधार्थ मेणबत्ती मार्च शांततेत संपन्न....

मनीषा वाल्मिकी’ हत्या व अत्याचार निषेधार्थ मेणबत्ती मार्च शांततेत संपन्न...

अत्याचार करणाऱ्या फाशी शिक्षा झाली पाहिजे-अमरसिंह ढाका

उत्तर प्रदेश च्या हाथरस जिल्ह्यातील चंद्रप्पा परिसरातील १९ वर्षीय मनीषा वाल्मीक युवर १४ सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करून तिची जिभ कापून मनका तोडण्यात आला. या मनुवादी अत्याचाराचे पडसाद देशभर उमटत असताना बीड (दि.३) येथील पेठ बीड वतारवेस या ठिकाणाहून ‘मनीषा वाल्मिकी’ हत्या व अत्याचार निषेधार्थ मेणबत्ती मार्च शांततेत काढण्यात आला. यावेळी सोशल डिस्टंसिंग नियम पाळत घटनेचा निषेध करण्यात आला. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती व प्रत्येकाच्या हातामध्ये मेणबत्ती घेऊन हा मार्च डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या पर्यंत आल्यानंतर याठिकाणी सर्वांनी भारतरत्न बाबासाहेबांना आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पीडित मनीषा वाल्मिकीच्या प्रतिमेसमोर मेणबत्त्या प्रज्वलित केल्या व श्रद्धांजली पुष्प वाहिली व  २ मिनीटे शांत  राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती, ज्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते पप्पू कागदे, वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. नितीन सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते अमरसिंह ढाका, माजी नगरसेवक रामसिंग टक, राष्ट्रवादीचे नेते बाळसाहेब गव्हाणे, विलास जोगदंड, किशन तांगडे, भाई दत्ता प्रभाळे, दत्तात्रय सौदरमल, वाल्मीक समाजाचे प्रतिनिधी  सत्यनारायण ढाका, कपिल सौदा, संजय घागट , जितेंद्र सौदा, विजय पिव्हाळ, सत्यवान ढाका, नरसिंग पिव्हाल, किसन  बहोत, विजेंद्र दुलगच, सतपाल लाहोट,भगतसिंग लाहोट, अविनाश जोगदंड, प्रभाले, रवी बहोती, चारुशीला ढाका, शारदा डुळगच, व सर्व महिला भगिनी, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बीड

प्रतिनिधी -विश्वनाथ शरणांगत

_____________

Also see : सहकारमंत्र्यांच्या दालनात 'कोरोना किलर' उपकरण

https://www.theganimikava.com/Corona-Killer-device-in-the-room-of-the-Minister-of-Co-operation