नर सेवा - नारायण पूजा या भावनेने १०१ निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान

रक्तदान शिबिरामध्ये १०१ निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले ज्यामध्ये ७१ पुरुष आणि ३० महिलांचा समावेश होता.

नर सेवा - नारायण पूजा या भावनेने १०१ निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान
Male service - spontaneous blood donation of 101 Nirankari devotees with the spirit of Narayan Pooja
नर सेवा - नारायण पूजा या भावनेने १०१ निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान

नर सेवा - नारायण पूजा या भावनेने १०१ निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान

कल्याण : निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शिकवणूकीला अनुसरुन ‘नर सेवा – नारायण पूजा’ हा भाव बाळगून संत निरंकारी सत्संग भवन, गोल मैदान उल्हासनगर येथे संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने रविवारी आयोजित रक्तदान शिबिरामध्ये १०१ निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले ज्यामध्ये ७१ पुरुष आणि ३० महिलांचा समावेश होता.

      संत निरंकारी मिशन मानवतेच्या सेवेमध्ये सदोदित आपले योगदान देत आले आहे आणि कोविड-१९ च्या महामारी दरम्यानदेखिल आतापर्यंत रेशन व लंगर वितरण, कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क, पीपीई कीटस यांसारख्या सुरक्षा सामग्रीचे वितरण करत आले आहे. सध्याच्या अनलॉक स्थितिचा लाभ घेऊन तसेच रक्त टंचाईचा विचार करुन मागिल सुमारे दीड महिन्यापासून मिशनच्या वतीने रक्तदान अभियान राबविण्यात येत असून त्या अंतर्गत विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. याच मोहिमे अंतर्गत उल्हासनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये निरंकारी भक्तांच्या चेहऱ्यावर निष्काम मानवसेवेचे भाव झळकत होते.  

      या रक्तदान शिबिरामध्ये उल्हासनगर सैंट्रल हॉस्पिटलच्या रक्तपेढीने ४८ युनिट रक्त संकलित केले तर रेड क्रॉसच्या रक्तपेढीने ५३ युनिट रक्त संकलित केले. संत निरंकारी मंडळाच्या डोंबिवली झोनचे क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे यांच्याहस्ते या रक्तदान शिविराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक किशनचंद नेनवानी तसेच सेवादलचे अधिकारी उपस्थित होते.

      शिबिरामध्ये प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या कोविड-१९ संदर्भातील निर्देशांचे, उदा. मास्क परिधान करणे, सॅनिटाईझरचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे इ.से यथायोग्य पालन करण्यात आले.  संत निरंकारी मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी सेवादल आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहयोगाने रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यात आले.

      अशाच प्रकारचे रक्तदान शिबिर संत निरंकारी सत्संग भवन, चेंबूर, मुंबई येथेही त्याच दिवशी आयोजित करण्यात आले ज्यामध्ये २२१ निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने व सेवाभावनेने रक्तदान केले.

कल्याण, ठाणे

 प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

__________

Also see : मुरबाड मधील मुस्लीम लोकसेवकाची श्रीराम मंदिरा साठी ९ लाखांची मदत...

https://www.theganimikava.com/9-lakh-assistance-from-Muslim-public-servant-for-Shri-Ram-Mandir-in-Murbad