महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत

महाराष्ट्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन आणखी 15 दिवसांनी वाढवण्याबाबत मंत्रिमंडळ आग्रही असल्याचं समोर आलंय.

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत
Maharashtra Lockdown update

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत 

Lockdown in Maharashtra till 31st May

महाराष्ट्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन आणखी 15 दिवसांनी वाढवण्याबाबत मंत्रिमंडळ आग्रही असल्याचं समोर आलंय.

महाराष्ट्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन आणखी 15 दिवसांनी वाढवण्याबाबत मंत्रिमंडळ आग्रही असल्याचं समोर आलंय. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः याबाबत सुतोवाच केलंय. लॉकडाऊन वाढवण्याबाबत मंत्रिमंडळ आग्रही आहे. 

राजेश टोपे म्हणाले, “लॉकडाऊनबाबत अनेकांना अपेक्षा आहेत. मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत बोलून दाखवलं. कारण लॉकडाऊन केल्यानंतर कोरोना रुग्णसंख्या कमी झाली. साधारणतः कोरोना रुग्णांच्या संख्येत 7 लाखांना पोहचलेला महाराष्ट्र आता 4 लाख 75 हजाराच्या दरम्यान आलाय. म्हणजे मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या संख्येत घट झालीय.

भारताचा दर दिवशीचा रुग्णवाढीचा दर 1.4 म्हणजे साधारणतः दीड टक्का आहे. महाराष्ट्राचा रुग्णवाढीचा दर प्रतिदिवस 0.8 इतकाआहे. त्यामुळे महाराष्ट्राचा वाढीचा दर भारताच्या रुग्णवाढीच्या दराच्या निम्मा आहे. बाधितांच्या दरातही महाराष्ट्रात घट झालीय. त्यामुळे ही संख्या आणखी कमी करण्यासाठी राज्यात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची एकमताने मागणी बैठकीत झाली. 

राजेश टोपे, “रुग्णांच्या संख्येत घट म्हणजे कोरोनाची कर्व पूर्ण स्टेबल झालीय असा याचा अर्थ नाही. पण आपण संख्येत घट होत असलेल्या राज्यांमध्ये आहोत. इतर राज्यांमध्ये याचं प्रमाण खूप जास्त आहे. 36 राज्यांच्या या देशात आपण रुग्ण वाढीत 30 व्या क्रमांकावर आहोत. राज्यात म्युकरमायकोसिस वाढत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण कमी होताना दिसत असले तरी काही ठिकाणी वाढत आहेत. त्यामुळे हा लॉकडाऊन किमान 15 दिवस वाढवावा अशी चर्चा आणि अपेक्षा मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांना सांगितली. तेच यासंदर्भातील अंतिम निर्णय घेतील.”

राजेश टोपे म्हणाले, “राज्यातील लसीकरण केंद्रावर आता केवळ दुसरा डोस घेणाऱ्यांनीच यावे. पहिला डोस लसीकरण केंद्रांवर आता मिळणार नाही. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस कोरोना रोखण्यासाठी तितकाच महत्वाचा आहे. राज्यात 20 लाख नागरिकांना दुसरा डोस देणे बाकी आहे. अशात राज्य सरकारने लसीकरण केंद्रावर केवळ दुसरा डोस पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सध्या 16 लाख कोविशिल्ड (Covishield), तर 4 लाख कोव्हॅक्सिन  अशी 20 लाख लस बाकी आहे. 7 लाख कोविशिल्ड, तर 4 लाख कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांची संख्या बाकी आहे. 

 सरकारने केवळ लसीकरण केंद्रांवर तूर्तास दुसऱ्या लस देण्यासाठी प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.