तात्काळ देशव्यापी लॉकडाऊन लागू करा

देशभरात कोरोनाचं संकट वाढल्याने आता कोरोना टास्क फोर्सनेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशव्यापी लॉकडाऊन लावण्याचा सल्ला दिला आहे

तात्काळ देशव्यापी लॉकडाऊन लागू करा
Maharashtra Lockdown

तात्काळ देशव्यापी लॉकडाऊन लागू करा

immediately needs countrywide lockdown

देशभरात कोरोनाचं संकट वाढल्याने आता कोरोना टास्क फोर्सनेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशव्यापी लॉकडाऊन लावण्याचा सल्ला दिला आहे.

देशभरात कोरोनाचं संकट वाढल्याने आता कोरोना टास्क फोर्सनेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशव्यापी लॉकडाऊन लावण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम झाल्याने देशातही हाच फॉर्म्युला लावला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल हे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रिपोर्ट करतात. या टास्क फोर्समध्ये एम्स आणि आयसीएमआरचे तज्ज्ञ आहेत. या टास्क फोर्सच्या काही सदस्यांनी देशव्यापी लॉकडाऊन लावण्याचा सल्ला दिला आहे. या तज्ज्ञांच्या मतानुसार, कोरोनाची साखळी तात्काळ तोडण्याची गरज आहे. आरोग्य व्यवस्था ढासळली आहे.

कोरोनाच्या संसर्गाची रोजची स्थिती अशीच राहिली तर आरोग्य व्यवस्थेची पूर्णत: वाट लागेल. संसाधने वाढवण्याचीही मर्यादा असते. त्यामुळे संक्रमणाची संख्या आधी कमी केली पाहिजे. त्यासाठी कोरोनाची साखळी तोडावी लागणार आहे.

एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोविड फैलावतो. देशव्यापी लॉकडाऊन लागू केल्यास एकमेकांचा संपर्क होणार नाही. परिणामी कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल. तसेच कोरोना रुग्णांची संख्याही घटेल, असं कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांचं म्हणणं आहे.

20 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी लॉकडाऊन टाळण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन राज्यांना केलं होतं. लॉकडाऊन हा पहिला पर्याय असू नये असंही त्यांनी म्हटलं होतं. काहीच पर्याय नसेल तरच लॉकडाऊनचा विचार करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या होत्या.

लॉकडाऊन आवश्यक आहे हे जनतेला सांगितलं पाहिजे, हे आम्ही गेल्या महिन्याभरापासून सांगत आहोत. थोडा थोडा लॉकडाऊन करून चालणार नाही. देशव्यापी लॉकडाऊनच केला पाहिजे. कारण देशात कोरोना संक्रमण वाढत आहे, असं टास्क फोर्सच्या एका सदस्याने सांगितलं. सदस्याने आरोग्य व्यवस्था ढासळत आहे. त्यात सुधारणा करणं गरजेचं आहे. शिवाय आरोग्य व्यवस्थेवरील ताण दूर करणं गरजेचं आहे.

देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यात आणखी भर पडू नये, यासाठी देशव्यापी लॉकडाऊन हाच पर्याय आहे, असं या सदस्याने सांगितलं.