बाळासाहेब थोरात एक वर्षाचं तर काँग्रेस आमदार एक महिन्याचं मानधन

राज्यातील कोरोनाचं वाढतं संकट आणि लसीकरणावर येणारा खर्च या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व आमदारांनी त्यांचं एक महिन्याचं मानधन सीएम रिलीफ फंडात देण्याचा निर्णय घेतला आहे.

बाळासाहेब थोरात एक वर्षाचं तर काँग्रेस आमदार एक महिन्याचं मानधन
Maharashtra Congress news

बाळासाहेब थोरात एक वर्षाचं तर काँग्रेस आमदार एक महिन्याचं मानधन

Maharashtra Congress MLAs to donate one-month salary to CM's Relief Fund

राज्यातील कोरोनाचं वाढतं संकट आणि लसीकरणावर येणारा खर्च या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व आमदारांनी त्यांचं एक महिन्याचं मानधन सीएम रिलीफ फंडात देण्याचा निर्णय घेतला आहे. 

राज्यातील कोरोनाचं वाढतं संकट आणि लसीकरणावर येणारा खर्च या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व आमदारांनी त्यांचं एक महिन्याचं मानधन सीएम रिलीफ फंडात देण्याचा निर्णय घेतला आहे. मीही एक वर्षाचं मानधन देणार आहे. तसेच महाराष्ट्र काँग्रेसकडून सीएम रिलीफ फंडात 5 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

तशी माहिती काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तसेच आमच्या अमृत उद्योगातील पाच हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्चही सीएम रिलीफ फंडात देणार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. 

बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. सर्वांचे मोफत लसीकरण झालं पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत. यापूर्वीचे लसीकरणही मोफत झालं आहे. त्यामुळे आम्हीही मोफत लसीकरण करणार आहोत.

यावर मोठा खर्च येणार आहे. त्यामुळे मी माझं एक वर्षाचं मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे. काँग्रेसचे सर्व आमदारही त्यांचं एक महिन्याचं मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत. तसेच महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निेधीला पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत, असं सांगतानाच सीएम रिलीफ फंडाला निधी देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावं असं आवाहन थोरात यांनी केलं.

जे लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यांनी पाच लोकांच्या लसीकरणाचा भार उचलावा, असं अभियान राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतिक पाटील यांनी सुरू केलं आहे. ते स्वत: त्यांच्या आणि इतर पाच जणांच्या लसीकरणाचा खर्च उचलणार आहेत. हा स्तुत्य उपक्रम असून सर्वांना प्रतिक पाटील यांचं अनुकरण करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

आमच्या अमृत उद्योगात एकूण पाच हजार कर्मचारी काम करत आहेत. त्यांच्या लसीकरणाचा खर्चही आम्ही उचलणार असून हा पैसा सीएम रिलीफ फंडात देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 895 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 66358 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तसेच 67752 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या एकूण 672434 सक्रीय रुग्ण असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.21 टक्के आहे. 


राज्यात काल दिवसभरात 985 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू हे पुणे महापालिकेत झाले आहेत. पुणे महापालिकेत दिवसभरात 117 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर त्यापाठोपाठ ठाणे आणि मुंबई महापालिकेत कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तर दुसरीकडे गेल्या 5 दिवसातील कोरोनामुळे मृत्यूंची संख्याही सातत्याने वाढत आहे. काल राज्यात कोरोना मृत्यूंचा आकडा हा सर्वाधिक असल्याचे समोर आले. त्यामुळे वाढते कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे तांडव पाहायला मिळत आहे. राज्यातील कोरोनाने महाराष्ट्रात इतकं थैमान घातलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी अशाप्रकारे एकाचवेळी अनेकांवर अंत्यसंस्काराची वेळ आलीय. त्यामुळे कोरोनाचं हे मृत्यूतांडव अनेकांना धडकी भरवत आहे. अनेकांना आपल्या जवळच्या लोकांना यात गमवावं लागत आहे.

28 एप्रिल – 985
27 एप्रिल – 895
26 एप्रिल – 524
25 एप्रिल – 832
24 एप्रिल – 676


राज्यात काल 63,309 नव्या रुग्णांची नोंद झाल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 44,73,394 झाली आहे. राज्यात काल 62,181 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आतापर्यंत एकूण 37,30,729 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  83.4 % एवढे झाले आहे.तर काल राज्यात दिवसभरात सर्वाधिक 985 जणांचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित मृतांची संख्या 67 हजार 214 इतकी झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 टक्के इतका आहे.