श्रीनिवास पाटलांची राजकीय कारकीर्द

शरद पवारांनी शब्द टाकला आणि श्रीनिवास पाटील एका पायावर तयार झाले. त्यानंतर जे काही घडलं तो इतिहास महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे.

श्रीनिवास पाटलांची राजकीय कारकीर्द
MP Shrinivas Patil news

श्रीनिवास पाटलांची राजकीय कारकीर्द

Srinivas Patil's political career

शरद पवारांनी शब्द टाकला आणि श्रीनिवास पाटील  एका पायावर तयार झाले. त्यानंतर जे काही घडलं तो इतिहास महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. 

 2014 मध्ये देशात सर्वाधिक मतांनी निवडून येणाऱ्यांपैकी एक असलेल्या उदयनराजे भोसलेंविरोधात उभं राहण्यासाठी कोणीही धजावत नव्हतं. मात्र शरद पवारांनी शब्द टाकला आणि श्रीनिवास पाटील  एका पायावर तयार झाले. त्यानंतर जे काही घडलं तो इतिहास महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. 

11 फेब्रुवारी 1941 साली पाटण तालुक्यातील मारुल हवेली या गावात एका शेतकरी कुटुंबात श्रीनिवास पाटील यांचा जन्म झाला. बालपणापासूनच त्यांना कर्मवीर भाऊराव पाटील आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारख्या थोरामोठ्यांचा सहवास लाभला. शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर त्यांना यशवंतराव चव्हाण, धनंजय गाडगीळ यांचे मार्गदर्शन लाभले. या सगळ्या शिदोरीच्या जोरावर श्रीनिवास पाटील हे जिल्हाधिकारी झाले.

शरद पवार यांच्याइतकेच पावसाळे पाहिलेला आणि कायम त्यांच्या बाजूला भक्कमपणे उभे असणारे श्रीनिवास पाटील हे नाव साताऱ्यातील 2019 च्या पोटनिवडणुकीनंतर जणू दंतकथाच झाले आहे. सुरुवातीला सनदी अधिकारी असणाऱ्या श्रीनिवास पाटील यांना शरद पवार यांनी राजकारणात आणले.

साधी राहणी, रांगड्या बोलीतील भाषणे, गावोगावच्या जत्रा आणि कुस्तीची मैदाने आणि पंगतीला बसून कार्यकर्त्यांच्या पत्रावळीमध्ये जेवण करण्यामुळे ते लोकांना आपल्या घरातील व्यक्ती असल्यासारखे वाटत. 1999 ते 2004 आणि 2004 ते 2009 या काळात पाटील यांनी खासदारपद भूषविले होते. त्यानंतर श्रीनिवास पाटील यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. 1 जुलै 2013 ते 26 ऑगस्ट 2018 या कालावधीत ते सिक्कीमचे राज्यपाल होते.

78 वर्षीय शरद पवारांची साताऱ्यातील सभा केवळ महाराष्ट्रानेच नाही तर देशाने पाहिली. उभ्या पावसात शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना झालेली चूक सातारकरांसमोर मान्य केली. ती चूक सुधारण्याची संधी मागितील. पाऊस कोसळत होता, 78 वर्षीय पवार भिजत होते. त्यावेळी पवारांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांचा मित्र-श्रीनिवास पाटीलही उभे होते. पवारांनी भाषण करुन उभ्या पावसात ‘आग’ लावली.

पवारांच्या भाषणानंतर श्रीनिवास पाटलांनी घोषणा दिली, ‘मान छत्रपतीच्या गादीला, तुमचं मत राष्ट्रवादीला.. श्रीनिवास पाटलांची ही घोषणा सातारकरांनी सत्यात उतरवली.

त्यावेळी कराड म्हणजे चव्हाण कुटुंबीयांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील आनंदराव चव्हाण, आई प्रेमिला चव्हाण हे दोघेही कराड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यामुळे या मतदारसंघात तुलनेने नवख्या असलेल्या श्रीनिवास पाटील यांचा निभाव कसा लागेल, असा प्रश्न अनेकांना पडला होता. 

दांडगा जनसंपर्क, लोकांमध्ये सहजपणे मिसळण्याचा स्वभाव आणि रांगड्या भाषणशैलीच्या जोरावर श्रीनिवास पाटील यांनी पहिल्याच फटक्यात पृथ्वीराज चव्हाण यांना अस्मान दाखवले.