ऑनलाइन घेण्यात येणाऱ्या जनसूनवणीला मनसेचा विरोध

महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण (MCRZA) संबधी जनसुनावणी ही ३० सप्टेंबर रोजी ऑनलाईन पध्दतीने घेण्याचे जिल्हाधिकारी ह्यांनी जाहीर केले आहे

ऑनलाइन घेण्यात येणाऱ्या जनसूनवणीला मनसेचा विरोध
MNS opposes online public hearings
ऑनलाइन घेण्यात येणाऱ्या जनसूनवणीला मनसेचा विरोध

ऑनलाइन घेण्यात येणाऱ्या जनसूनवणीला मनसेचा विरोध

महाराष्ट्र (maharshtra) सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण (MCRZA) संबधी जनसुनावणी हि ३० सप्टेंबर रोजी ऑनलाईन पध्दतीने घेण्याचे जिल्हाधिकारी ह्यांनी जाहीर केले आहे. पालघर (palghar) जिल्ह्याचे उक्त प्रारूप सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडे हे सर्व जनतेच्या सूचना / हरकती करीता असते. परंतु सदर जनसुनावणी ही व्हिडिओ कॉन्फ्ररंन्सव्दारे घेण्यात येणार आहे. त्याबद्दल शंका निर्माण होत आहे. जनसूनवणीला इतकी घाई का, लोकांच्या हरकती / सूचना ह्याच्याशी काहीही देणे घेणे नाही असा आमचा आरोप आहे.

पालघर (palghar) जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने किती लोकं सहभागी होऊ शकतात ह्या बद्दल मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. जिल्ह्यातील जनता सदर आराखड्याबाबत अनभिज्ञ आहे. नक्की काय आहे? ह्याची माहिती सबंधित ग्रामपंचायतीना देणे गरजेचे असताना प्रशासनाने असे काहीही केलेलं नसून हुकुमशाही पद्धतीने वागत आहात त्याचा निषेध करतो. ही जनसुनावणी जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द करावी आणि कोरोना (corona) परिस्थिती ठीक झाल्यावर सर्वांना विश्वासात घेऊन पुन्हा ठेवावी अशी आमची मागणी आहे. जनसुनावणी रद्द नाही केली तर महाराष्ट्र (maharashtra) नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करील असा इशारा दिला. तर येत्या पुढील काही दिवसांत प्रत्येक गावा गावात जाऊन याबाबत जनजागृती करू असे प्रतिपादन मनसेचे पालघर (palghar) उपजिल्हाध्यक्ष समीर मोरे व मनसे विद्यार्थी सेना पालघर (palghar) लोकसभा क्षेत्र अध्यक्ष धिरज गावड व कार्यकर्ते यांनी केले.

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

_______

Also see : केस गळती थांबवणे ते स्मरणशक्ती वाढवणे : जास्वंद फुलाचे हे थक्क करणारे फायदे...!!

https://www.theganimikava.com/Know-the-benefits-of-Hibiscus-Sabdariffa