मनसे खडवली जनसंपर्क कार्यालयाचे अविनाश जाधव यांच्या हस्ते उद्घाटन 

सामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर आवाज उठविण्यासाठी एक हक्काची जागा हवी यासाठी खडवली विभागात मनसे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले......

मनसे खडवली जनसंपर्क कार्यालयाचे अविनाश जाधव यांच्या हस्ते उद्घाटन 
MNS Khadavali Public Relations Office inaugurated by Avinash Jadhav

मनसे खडवली जनसंपर्क कार्यालयाचे अविनाश जाधव यांच्या हस्ते उद्घाटन 


 भिवंडी  खडवली येथे  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांचा विचार तळागाळात पोहचविण्यासाठी व सामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर आवाज उठविण्यासाठी एक हक्काची जागा हवी यासाठी खडवली विभागात मनसे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन (दि.16 ) मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
            या ऊद्घाटन सोहळ्यात ठाणे जिल्हा संघटक मदन अण्णा पाटील,भिवंडी लोकसभा क्षेत्र जिल्हा अध्यक्ष शैलेश बिडवी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
       ह्या कार्यक्रमाचे आयोजन कल्याण उपतालुका अध्यक्ष  राजाभाऊ लोणे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन ठाणे पालघर जिल्हा सचिव दिनेश बेलकरे आणि खडवली विभाग प्रमुख तेजस जाधव यांनी केले होते.

भिवंडी , ठाणे 
प्रतिनिधी - सत्यवान तरे 

______

Also see: पालघर जिल्हा सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांकडून पालकमंत्री दादा भुसे यांना विविध मागण्यांचे निवेदन

https://www.theganimikava.com/Statement-of-various-demands-to-the-Guardian-Minister-Dada-Bhuse-from-Palghar-District-Sakal-Maratha-Samaj-and-Maratha-Kranti-Morcha-Coordinators