सविनय कायदे भंग करत मनसेचा लोकल प्रवास
सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सुरू करा, अन्यथा आम्ही सविनय कायदेभंग आंदोलन करू, असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता....

सविनय कायदे भंग करत मनसेचा लोकल प्रवास
सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सुरू करा, अन्यथा आम्ही सविनय कायदेभंग आंदोलन करू असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. आज संदीप देशपांडे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करत लोकल प्रवास केला. तर मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ठाणे स्टेशनवर अटक केली. ठाणे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला.
सविनय कायदेभंगचा इशारा दिल्यानंतर रेल्वे पोलीसांनी संदीप देशपांडे यांनी रेल्वेने प्रवास कराल तर कायदेशीर कारवाई करू, अशी नोटीसही पाठविण्यात आली.
परंतु, त्यानंतरही संदीप देशपांडे यांनी लोकलने प्रवास केला. लोकल ही सर्वसामान्यांसाठी सुरू करावी, कल्याण- डोंबिवली येथून चाकरमानी हे तीन चार तास प्रवास करून ऑफिसला जातात, याचा त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना होणारा त्रास सरकारच्या लक्षात येत नाही, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कायदेभंग करून विनापरवानगी विनातिकीट लोकलने प्रवास करू असा इशारा देण्यात आला होता.
मनसेने पुकारलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनाला प्रवासी महासंघाने पाठिंबा दिला आहे. कर्जत कसारा वरून जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास होतोयं, लवकरात लवकर लोकल सुरू करण्यात यावी, अशी मागणी करत प्रवासी संघटनांनी मनसेच्या या कायदेभंगाला पाठिंबा दिला आहे.
नवी मुंबई
प्रतिनिधी - अनिल भास्करराव काकडे
_______
Also see : ग्रामीण पत्रकारांना कोव्हिडं सेंटर मध्ये राखीव कोटा असावा- NUJM ची मागणी..