एल अँड टी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ने ‘कोविड-19’च्या  काळात २३ हजार वंचित मुलांना दिले ऑनलाईन शिक्षण

कोरोनाच्या संकटात देशातील शालेय शिक्षण यंत्रणा डिजिटल स्वरूपात दुभंगली असताना 'लार्सन अँड टूब्रो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट' ने सॅप इंडियाच्या कोड उन्नती उपक्रमासोबत भागीदारीतून 'विद्या' हा उपक्रम राबविला...

एल अँड टी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ने ‘कोविड-19’च्या  काळात २३ हजार वंचित मुलांना दिले ऑनलाईन शिक्षण
L&T Public Charitable Trust provides online education to 23,000 disadvantaged children during covid-19
एल अँड टी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ने ‘कोविड-19’च्या  काळात २३ हजार वंचित मुलांना दिले ऑनलाईन शिक्षण
एल अँड टी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ने ‘कोविड-19’च्या  काळात २३ हजार वंचित मुलांना दिले ऑनलाईन शिक्षण

एल अँड टी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ने ‘कोविड-19’च्या  काळात २३ हजार वंचित मुलांना दिले ऑनलाईन शिक्षण

राज्यात सध्या सुरू असलेल्या कोरोनासारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर लार्सन अँड टूब्रो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने (एलटीपीटी) विविध राज्यामध्ये ग्रामीण भागात २३ हजार वंचित मुलांना 'विद्या' या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे आणि त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये याबाबत दक्षता घेण्यात आली. कोरोनाच्या संकटात देशातील शालेय शिक्षण यंत्रणा डिजिटल स्वरूपात दुभंगली असताना 'लार्सन अँड टूब्रो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट' ने सॅप इंडियाच्या कोड उन्नती उपक्रमासोबत भागीदारीतून 'विद्या' हा उपक्रम राबविला.

हा उपक्रम कॉर्पोरेट क्षेत्राकडून नागरिकांकरिता राबविण्यात येणारा, डिजिटल साक्षरतेस चालना देणारा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कैशल्ये विकसीत करणारा आहे. समुदायाना विशेषतः मुलांच्या पालकांना या मध्ये सहभागी करून घेण्यात येते. प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन आणि अगस्त्य फाऊंडेशन या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या दोन प्रमुख स्वयंसेवी संस्थांनी या कामी एलटीपीसीटी शी हात मिळवणी केली. कोरोनाच्या काळातही या सर्वांना मिळून डिजिटल शैक्षणिक उपक्रम आणि विज्ञान शिक्षण कार्यक्रम आयोजित केले. या कार्यक्रमाच्या यशाबद्दल टिप्पणी करताना एल अँड टी च्या प्रवक्त्याने सांगितले. जागतिक महामारी दरम्यान अनेक कंपन्यांनी आपली सामाजिक जबाबदारी स्वतःचे कर्मचारी त्यांचे कुटुंबीय आणि आसपासच्या समुदायापुरती मर्यादित ठेवली. परंतु लार्सन अँड टुब्रोच्या सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टने (एलटीपीसीटी) आपले काम समाजातील वंचित घटकांपर्यंत नेले आणि आपल्या वचनबद्धतेचे पालन केले.

      विद्या या उवक्रमातर्फे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तलासरी या भागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन ग्रीष्मकलीन शिबिरे, विशेष रेडिओ कार्यक्रम आयोजित करण्यात आले. गुजरातमधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही ऑनलाइन वर्ग घेण्यात आले. तसेच महाराष्ट्रातील अहमदनगर, तळेगाव, तलासरी, गुजरातमधील खरेल, नवसारी, हाजीरा, सुरत, वडोदरा, आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम, हरियानामधील फिरीदाबाद तसेच तामिळनाडूमधील कोईमतूर येथे विज्ञान विषयक नाविन्यपूर्ण प्रकल्प घेण्यात आले. एलटीपीसीटीने गुजरातमध्ये शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाइन स्वरूपात आयोजित केला आहे. तलासरीमध्ये विद्या प्रकल्पात मुलांच्या पालकांना सहभागी करून घेण्यात आले या मॉडेलमध्ये क्लस्टर रिसोर्स पर्सन्स आणि संचारक यांची नेमणूक करण्यात येते. या पदांसाठी मुलांची आई किंवा त्याच समाजातील तरुण पदवीधर यांना नेमण्यात येते. त्यांना बालसाहित्य पालकत्व समुपदेशन आणि डिजिटल शिक्षण यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांना त्या परिसरातील इतर कुटूंबे वाटून दिली जातात. त्या कुटूंबाशी दूरध्वनीवरून व प्रत्यक्ष भेटून संपर्क साधण्यास सांगितले. सध्या ही अशी शिक्षण सत्रे मोबाईल कॉल व  व्हाट्सऍप्सवरून घेतली जात आहेत.

रचना आणि योजना आपल्या जात असताना ग्रामीण आणि अल्प उत्पन्न असणार्‍या समुदायातील मुलांसाठी पालकांचा सहभाग आणि त्यांची देखरेख या गोष्टीची थोडी जास्त गरज असते. पालकांच्या सल्ल्यामुळे मुले स्व-अभ्यास करण्यात आणि छंद विकसित करण्यास कोणत्याही गोष्टीचा बारकाईने विचार करण्यास, नवीन छंद विकसित करण्यास, कोणत्याही गोष्टीचा बारकाईने विचार करण्यास आणि कोरोना संकटाच्या काळात शिकण्याचे महत्त्व जाणण्यासाठी प्रोत्साहित होतात असे या प्रवक्त्याने म्हटले. सीआरपी व संचारक यांनी व्हॉट्सऍप्स ग्रुप च्या माध्यमातून विध्यार्थी आणि स्थानिक समुदयाशी संपर्क साधला. डिजिटल स्वरूपात ग्रीष्मकलीन शिबीरे घेतली. दररोज सकाळी सीआरपी तर्फे विद्यार्थ्यांना व्हॉट्सऍप्स ग्रुप मधून कार्ये दिली जात. हे विद्यार्थी दिवसअखेरीस त्यांनी केलेल्या कार्याचा अहवाल ग्रुपवर शेअर करीत ऑनलाइन ग्रीष्मकालीन शिबिरांमध्ये सुरुवातीला हस्तकला उपक्रम आणि विज्ञान प्रयोगही आयोजित केले गेले.

गुजरातमध्ये त्यांनी ७ तालुक्यातील शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम अयोजित केला. ७०० हुन अधिक शिक्षकांपर्यंत तो पोहोचवला. या राज्यात एलटीपीसीटी ने विद्याच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्युत चुंबकत्व मानवी मेंदूची गुंतागुंत रासायनिक समीकरणाचे प्रकार इत्यादि विषयांचे स्पष्टीकरण देण्यासाठी व्हिडीओ तयार केले. त्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग घेतले. या व्यतिरिक्त अहमदनगर मधील एलटीपीसीटी ने अनेक वैज्ञानिकांच्या जीवनातील रोमांचक कथा तयार केल्या असून वंचित विद्यार्थ्यांना त्या ऐकवल्या जाऊन युनिसेफ व डिझाइन फॉर चेंज यांनी आयोजित केलेल्या युथ चॅलेंच मध्ये अहमदनगर आणि तळेगाव साधनांनी भाग घेतला. कोईमतूरमध्ये विद्या च्या संघाने फेसमास्क बनविणे, हात धुण्याचे तंत्र यासारख्या कोविड पासून सुरक्षिततेचे व खबरदारीचे कार्यक्रम राबवले. त्या परिसरातील रहिवाशांसाठी व्यक्तिमत्व विकासाचे उपक्रम ही घेण्यात आले.

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

____________

Also see : खा.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांना यश

https://www.theganimikava.com/MP-Pritamtai-Munde-efforts-succeed