कोयता बंद आंदोलन चालू आहे;ऊसतोड मजूरांनी कामावर जाऊ नये -अशोक हिंगे

जो पर्यंत नवीन करार होत नाही, ऊसतोडणीचा दरवाढ होत नाही, मजुरांच्या आरोग्याची हामी घेत नाहीत, तो पर्यंत ऊसतोड मजूर कामावर जाणार नाहीत...

कोयता बंद आंदोलन चालू आहे;ऊसतोड मजूरांनी कामावर जाऊ नये -अशोक हिंगे
Koyata bandh agitation is going on; sugarcane workers should not go to work - Ashok Hinge

कोयता बंद आंदोलन चालू आहे;ऊसतोड मजूरांनी कामावर जाऊ नये -अशोक हिंगे [ मराठवाडा प्रदेश आध्यक्ष वंचित बहूजन आघाडी ]

जो पर्यंत नवीन करार होत नाही, ऊसतोडणीचा दरवाढ होत नाही, मजुरांच्या आरोग्याची हामी घेत नाहीत, तो पर्यंत ऊसतोड मजूर कामावर जाणार नाहीत अशी भुमीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्षअ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. त्यामुळे कोणीही कारखान्यावर जाऊ नये, असे आवाहन वंचीतचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे (पाटील) यांनी केले आहे.

पत्रकात म्हटले आहे, ऊसतोड कामगारांच्या मजुरीच्या दरा बरोबरचं मुकादम वाहतूकदार यांचे कमीशन वाढवून त्यांचा आरोग्याची जबाबदारी कारखाना प्रशासनाने घ्यावी अशा न्याय मागण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनीसंपाची हाक दिलेली आहे.पंरतु काही जण जबरदस्तीने मजुरांना

घेवून चालले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. जे कामगार लपून-छपून कारखान्यावर गेले आहेत. त्यांची बिकट परिस्थिती आहे. पडत्या पावसात निवारा नाही, कुठलीही मदत नाही. ऊस तोडीचे कामही पावसामुळे सुरु करता येत नाही. तेंव्हा अशा परिस्थितीत ऊसतोड कामगारांनी संप मिटत नाही, आपल्या न्याय मागण्या मंजुर होत नाहीत तो पर्यंत गाव सोडू नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील
यांनी केले आहे.

बीड

प्रतिनिधी  - विश्वनाथ शरणांगत 

___________

Also see : श्रीलक्ष्मीचा अपमान करणार्‍या आणि 'लव्ह जिहाद'ला प्रोत्साहन देणार्‍या 'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घाला ! - हिंदु जनजागृती समिती

https://www.theganimikava.com/Ban-on-screening-of-Lakshmi-Bomb-insulting-Sri-Lakshmi-and-promoting-Love-Jihad-Hindu-Janajagruti-Samiti