कंगना राणावत बेताल वक्तव्याच्या विरोध

कंगना राणावत बेताल वक्तव्याच्या विरोधात कळवण शिवसैनिकांनी केला जाहिर निषेध

कंगना राणावत बेताल वक्तव्याच्या विरोध

नाशिक: कंगना राणावत बेताल वक्तव्याच्या विरोधात कळवण शिवसैनिकांनी केला जाहिर निषेध.  महाराष्ट्र व मुंबईला पाकव्याप्त काश्मिर म्हणून संबोधनारी अभिनेत्री कंगना राणावत ह्यांचा कळवण शहर व तालुका शिवसेना वतीने  कळवण बसस्थानक परिसरात जाहिर निषेध करण्यात आले.

यावेळी कंगना राणावत च्या पोस्टरवर कळवण शिवसेना महिला आघाडीच्या रणरागिणींनी चप्पलेचे फडके देऊन राग व्यक्त केले, तसेच कळवण शिवसेना पदाधिकार्यांनी कंगना राणावत यांनी मुंबई व मुंबई पोलीस यांच्या बद्दल केलेल्या हेताल वक्तव्याच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना महिला आघाडी च्या कळवण शहरप्रमुख अनुपमा वाघ व सहकारी तसेच कळवण तालुकाप्रमुख अंबादास जाधव,उपजिल्हा प्रमुख दशरथ बच्छाव, कळवण शहरप्रमुख साहेबराव पगार,विधानसभा सह संपर्क प्रमुख संभाजी पवार, शिवसेना ग्राहक कक्ष ग्रामीण जिल्हाप्रमुख संजयजी रौदळ,  कळवण शहरप्रमुख सुनिल पगार,उपशहरप्रमुख सचिन पगार ,सोशल मीडिया सेल नाशिक जिल्हा ग्रामीण प्रमुख ललित आहेर, आदि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थितीत होते. 

कळवण

प्रतिनीधी : मनोहर गायकवाड

______

Also see:उपजिल्हा रुग्णालय शहापूरचा भोंगळ कारभाराविरोधात आंदोलनाचा इशारा

https://www.theganimikava.com/Sub-District-Hospital-Shahpur--Demand-for-suspension-of-Dr-Pramod-Nirvane