आयपीएलच्या मैदानात कोरोनाची एण्ट्री

आज स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात नियोजित सामना खेळला जाणार होता. मात्र कोलकात्याच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे.

आयपीएलच्या मैदानात कोरोनाची एण्ट्री
KKR vs RCB IPL

आयपीएलच्या मैदानात कोरोनाची एण्ट्री

Corona's entry into the IPL arena

 कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात नियोजित सामना खेळला जाणार होता. मात्र कोलकात्याच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. 

 आज स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात नियोजित सामना खेळला जाणार होता. मात्र कोलकात्याच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे.

पीटीआयने हे वृत्त दिलं आहे. तथापि, कोलकाता आणि आयपीएलच्या अधिकृत निवेदनाची अद्यापपर्यंत कोणतंही स्टेटमेंट आलेलं नाहीय. दरम्यान आज आयपीएलची कोणतही मॅच खेळवली जाणार नाही. 

कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यातील आयपीएलची 30 मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाणार होती. परंतु कोलकात्याच्या संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्ती  आणि संदीप वॉरियर्स  यांना कोरोनाची लागण झाल्याने हा सांमना पुढे ढकलण्यात आला आहे.

चक्रवर्ती नुकताच त्याच्या खांद्याच्या स्कॅनसाठी बायो बबलच्या बाहेर गेला होता. त्याच वेळी कोरोनाने त्याला गाठलं असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वरुण चक्रवर्ती आणि वॉरियर वगळता केकेआरचे बाकीचे खेळाडू ठीक आहेत. त्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आहेत.

आयपीएल 2021 सुरू झाल्यानंतर खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी काही खेळाडूंना स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. ऑस्ट्रेलियन वेबसाइट द एजच्या रिपोर्टनुसार कोलकाता नाइट रायडर्सचे बरेच खेळाडू आजारी पडले आहेत.

अशा परिस्थितीत उर्वरित खेळाडू आणि कर्मचारी आयसोलेट आहेत. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, आजारी पडलेल्या खेळाडूंमध्ये वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचे नावही आहे.

संपूर्ण भारतात देशात कोरोनाने हाहाकार माजवलेला असताना अशा वातावरणात देखील आयपीएलची स्पर्धा सुरु आहे. संपूर्ण काळजी घेऊन ही स्पर्धी खेळविण्यात येतीय. याच पार्श्वभूमीवर स्पर्धी सुरु झाल्यापासून खेळाडू बायो बबल आहेत. दोन ते तीन दिवसांनंतर त्यांची कोरोना चाचणी केली जाते, त्यांचं हेल्थ चेकअप केलं जातं.

आज चाचणी केली असता कोलकात्याचे वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर्स या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.