मुसळधार पावसाने केडीएमसी मुख्यालय जलमय

शुक्रवारी विजेच्या कडकडाटांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवली मनपाच्या मुख्यालया समोरील पार्किंग तसेच महापौर इमारती समोरील परिसर जलमय झाला होता

मुसळधार पावसाने केडीएमसी मुख्यालय जलमय
KDMC headquarters flooded due to torrential rains
मुसळधार पावसाने केडीएमसी मुख्यालय जलमय

मुसळधार पावसाने केडीएमसी मुख्यालय जलमय

कल्याण (kalyan): शुक्रवारी विजेच्या कडकडाटांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे  कल्याण डोंबिवली मनपाच्या मुख्यालया समोरील पार्किंग तसेच महापौर इमारती समोरील परिसर जलमय झाला होता. तसेच कल्याण शहरात देखील या मुसळधार पावसाने विविध ठिकाणी पाणी साचले होते.

       सायंकाळी चारच्या सुमारास वीजेच्या गडगडाटासह कोसळलेल्या धुवाधांर पावसाने केडीएमसी (kdmc) मुख्यालया समोरील मेन गेटच्या परिसरातुन रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचे लोंढे तसेच मनपाच्या इमारतीच्या छतावरून पाईप द्वारे खाली येणारे पावसाचे पाणी मुख्यालयातील महापौर इमारत तसेच पार्किंग  परिसरात साचले होते.  अंन्डरग्राँऊन्ड गटारातुन पास न झाल्याने चारी चाकी गाड्याच्या टायर पर्यंत तर दुचाकीचा अर्धा भाग पाण्याखाली गेल्याने केडीएमसी मुख्यालय जलमय झाला होता.  

अवघ्या पाउण तासांच्या अवधीत झालेल्या धुवाधांर पावसाने मुख्यालया बाहेरील पार्किंग परिसरात पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी साचून अडंरग्राऊंड गटाराचे पितळ उघडे पडले आहे.  या पावसामुळे कर भरण्यासाठी तसेच आपल्या कामानिमित्त मनपात पार्किंग केलेल्या दुचाकीधारी नागरिकांच्या दुचाकीत पाणी शिरल्याने बंद पडल्या होत्या. महापौर इमारतीसमोर पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने तळे साचले. यावरून अडंर ग्राऊंड गटाराची सफाई वेळाच्या वेळेस होणे गरजेचे असल्याचे समोर आले आहे.

कल्याण , ठाणे
प्रतिनिधी- कुणाल म्हात्रे 

________

Also see : भाजपा शिक्षक आघाडीची कल्याण पूर्व कार्यकारणी जाहीर

https://www.theganimikava.com/BJP-teachers-alliances-welfare-executive-announced