कल्याण पूर्वेत "जिजाऊ सावित्री बाग"

बलात्कार, हत्या, अत्याचार झालेल्या महिला, मुलींच्या न्याय, सन्मान  हक्कासाठी, शासन प्रशासनाने न्याय देण्याच्या भूमिकेतून वागले पाहिजे...

कल्याण पूर्वेत "जिजाऊ सावित्री बाग"

कल्याण पूर्वेत "जिजाऊ सावित्री बाग"

कल्याण : बलात्कार, हत्या, अत्याचार झालेल्या महिला, मुलींच्या न्याय, सन्मान  हक्कासाठी, शासन प्रशासनाने न्याय देण्याच्या भूमिकेतून वागले पाहिजे याकरीता कल्याण पूर्वेत न्याय हक्क, सन्मानचा गजर सुरू करण्यात येणार असून यासाठी जिजाऊ सावित्री बाग सुरु करण्यात आली आहे.

हाथरसची कन्या  व भारतातील तमाम बलात्कार हत्या, अत्याचारास बळी पडलेल्या मुलींच्या महिलांच्या न्याय, सन्मान आणि श्रध्दांजली करीता एकत्रित येणं गरजेचे आहे. सातत्याने सामूहिक बलात्कार, हत्या सत्र सुरू आहेत. मुली , महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ होत आहेत. या करीता  शांततेत सनदशीर एक आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. याची रूपरेखा ठरविण्या करीता बुधवारी  कल्याण पूर्व मधे सामाजिक कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली.

या बैठकीत कल्याण पूर्वेत जिजाऊ सावित्री बाग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हि बाग शनिवार पासून  सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये  श्रध्दांजली सह चर्चा सत्र आयोजित करणे. सामाजिक कार्यकर्ते, स्त्रियांच्या संदर्भात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना चर्चा सत्रास आमंत्रित करणे. सर्वसमावेशक कार्यक्रम असलेला हा कार्यक्रम  शांततेत सनदशीर मार्गाने होईल. हा कार्यक्रम छ. शाहू उद्यान कोळसेवाडी कल्याण पूर्व . येथे  रोज सायंकाळी ५ ते ७ वाजे पर्यंत असेल.

या बैठकीला विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिजाऊ सावित्रीबाग बेटी बचाओ भारत बचाओ आंदोलनात तमाम संवेदनशील लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सर्व उपस्थित समन्वयक यांनी केले आहे. तर  जिजाऊ सावित्री बाग या  आंदोलनास नगरसेवक महेश गायकवाड यांनी पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती जिजाऊ सावित्री बाग आंदोलनाचे प्रमुख समन्वयक माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी दिली.

कल्याण,ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे

____________

Also see :आधीच केडीएमसीत खड्डेमय रस्ते, त्यात पोकलेनने उकरला रस्ता

https://www.theganimikava.com/Already-rocky-roads-with-KDMC-including-the-road-dug-by-Poklen