'JEE advanced' चा निकाल जाहीर!
जेईई अॅडव्हान्स्डचा निकाल (JEE advanced) आयआयटी (IIT) दिल्लीकडून आज जाहीर करण्यात आला असून चिराग फेलोर याने आयआयटी (IIT) मुंबई झोनमधून प्रथम क्रमांक मिळवला आहे.

'JEE advanced' चा निकाल जाहीर!
पिंपरी (Pimpri) : जेईई अॅडव्हान्स्डचा निकाल (JEE advanced) आयआयटी (IIT) दिल्लीकडून आज जाहीर करण्यात आला असून चिराग फेलोर याने आयआयटी (IIT) मुंबई झोनमधून प्रथम क्रमांक मिळवला आहे.
आयआयटी (IIT) मद्रासचा गांगूला भुवन रेड्डी दुसऱ्या तर आयआयटी (IIT) दिल्लीचा वैभव राज याने तिसऱ्या स्थानी बाजी मारली आहे.
नियती मेहता ही विद्यार्थिनी मुलींमधून आयआयटी (IIT) मुंबई झोनमधून प्रथम आली असून तिने 62 वा क्रमांक मिळवला आहे.
IIT मुंबई झोनमधील प्रथम 5 विद्यार्थी :
● चिराग फेलोर: 1 क्रमांक
● आर महेंदर राज: 4 क्रमांक
● वेदांग आसगावकर: 7 क्रमांक
● स्वयं चुबे: 8 क्रमांक
● हर्ष शाह: 11 क्रमांक
परीक्षेविषयी देशभरात जेईई अॅडव्हान्स्ड (JEE advanced) परीक्षेचे आयोजन 27 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. यासाठी भारतासहित विदेशातदेखील परीक्षा केंद्रे होती. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 96% विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून पेपर 1 मध्ये 1,51,311 विद्यार्थी तर पेपर 2 मध्ये 1,50,900 विद्यार्थी सहभागी होते.
JEE Advance 2020 निकाल लिंक : https://jeeadv.ac.in/
पिंपरी , पुणे
प्रतिनिधी - आत्माराम काळे
_________
Also see : मुरबाडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेना पदनियुक्ती सोहळा संपन्न !