पक्षांतराचा मुहूर्त ठरला
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती....

पक्षांतराचा मुहूर्त ठरला
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. पण, अखेर आता एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरली आहे. फक्त एकनाथ खडसेच नाहीतर त्यांची कन्या रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.
एकनाथ खडसे हे 22 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा प्रवेश होणार आहे. मुंबईतील प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.एकनाथ खडसे यांच्या जाण्यामुळे भाजपला धक्का बसणार आहे हे निश्चित आहे.
बारामती
प्रतिनिधी - रूपेश महादेव नामदास
________
Also see : अखिल भारतीय ओबीसी महासभा ठाणे जिल्हा पदनियुक्ती कार्यक्रम संपन्न
https://www.theganimikava.com/All-India-OBC-Mahasabha-Thane-District-Appointment-Program-Concluded