आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना होतोय का कालबाह्य दुधाचा पुरवठा? 

 कळवण एकात्मिक आदिवासी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना कालबाह्य होत असणारे सुगंधीत दुधाचे पाकीट वितरीत करण्यात आले

 आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना होतोय का कालबाह्य दुधाचा पुरवठा? 

 कळवण एकात्मिक आदिवासी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना कालबाह्य होत असणारे सुगंधीत दुधाचे पाकीट वितरीत करण्यात आले मात्र आदिवासी बचाव अभियान  संघटनांनी आक्रमण भुमिका घेतल्याने सध्या दुधाचे वाटप थांबवले आहे.

शासकीय आश्रम शाळांमध्ये मुलांना पोषण आहार साठी अंडी, फळे इ. वितरीत केले जात होते मात्र शासनाने त्यांत बदल करून विध्यार्थ्यांना सुगंधी ट्रेट्रापॅक दुधाचे पॅकेट सुरू केले. मात्र कोवीड-19 च्या कारणाने सर्व शाळा बंद होत्या शाळा  बंद असल्याने विध्यार्थ्यांना वितरीत केले जाणारे सर्व वस्तू- साहित्य वितरण बंद होते मग हे दुध कुठे होते, त्याच बरोबर या पाकिटांची पॅकिंग तारीख फेब्रुवारी ते मार्च महिन्यातील असून मुदतबाह्य कालावधी तारीख ही सप्टेंबर महिन्यात वेगवेगळ्या तारखेला संपत असून या महिन्यात अवघ्या दोन ते तीन दिवसात वाटपाचे घाट का? विदयार्थ्यांच्या आरोग्यास काही बाधा निर्माण झाली तर त्यास जबाबदार कोण असे विविध प्रश्न पालक, आदिवासी संघटनांकडून उपस्थित केले जात आहेत. सदर प्रकाराबद्दल आमदार नितीन पवार यांना माहिती मिळताच त्यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत दुध वितरण बंद करण्यास सांगितले. सदरील प्रकाराबाबत महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान नाशिक जिल्हा संघटनेच्या वतीने प्रधान सचिव आदिवासी विभाग यांना मेल द्वारे निवेदन पाठवून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून सबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

कळवण

प्रतिनीधी - मनोहर गायकवाड

_________

Also see : सोनेरी स्वराज्याची घडण.....

https://www.theganimikava.com/initiation-of-hindavi--swarajya