जगभरात कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट

जगभरात कोरोनापाठोपाठ (corona) आणखी एक संकट समोर आलं आहे. प्रशांत महासागरात ला-निना वादळाचा (la nina storm in pacific ocean) प्रभाव दिसून आला

जगभरात कोरोनापाठोपाठ  आणखी एक संकट
Influence of La-Nina storm in the Pacific Ocean

जगभरात कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट; प्रशांत महासागरात ला-निना वादळाचा प्रभाव

जगभरात कोरोनापाठोपाठ (corona) आणखी एक संकट समोर आलं आहे. प्रशांत महासागरात ला-निना वादळाचा (la nina storm in pacific ocean) प्रभाव दिसून येत असल्यानं सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणि कडाक्याची थंडी पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. भारतात 2020 च्या अखेरपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता असून सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.दक्षिणेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. भारतात ला निनाचा प्रभाव दक्षिणेकडील राज्यांत सगळ्यात जास्त दिसून येण्याची शक्यता आहे. दिसून येतो. ब्रिटीश शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की 1994 पासून पृथ्वीच्या पृष्ठभागावरून एकूण 28 लाख कोटी टन बर्फ वितळला आहे. ग्लोबल वॉर्मिंग, आणि वितळणाऱ्या बर्फामुळे जमीन आणि समुद्रातील तापमानावर परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

अमेरिकेच्या हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार प्रशांत महासागरात मोठ्या प्रमाणात ला-निनाचा प्रभाव दिसून येऊ शकतो. यामुळे सप्टेंबरमहिन्यात भारतात मुसळधार तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. वर्षाअखेरपर्यंत मान्सून परतेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.या वादळाचा भारतातील हिवाळ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. साधारण ऑक्टोबर महिन्यापासून भारतात थंडी सुरू होते मात्र या वर्षी काही बदल होणार आहेत. ला-निना वादळामुळे उत्तर-दक्षिण दिशेने कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. ज्यामुळे सायबेरियन वारे भारताच्या दिशेनं येत आहेत. त्याच्या परिणाम दक्षिण भारतात होणार असल्याचं सांगितलं जात आहे. हाड गोठवणारी थंडी तर काही ठिकाणी दवं आणि उंच पर्वत भागात हिमवृष्टी होऊ शकते असंही अंदाज व्यक्त केला जात आहे. 

जळगाव  

प्रतिनिधी - दिनेश पाटील 

____

Also see : पालघरमधील धामणी धरणाचे दरवाजे उघडले | Dhamni Dam | Palghar

https://www.theganimikava.com/3-of-5-doors-opened-of-dhamni-dam-palghar