आदित्य नारायणच्या ‘त्या’ संवादानंतर अमेय खोपकरांकडून कानउघडणी

सध्या सोनी टीव्हीचा 'इंडियन आयडॉल 12 हा कार्यक्रम सतत काहीना काही कारणामुळे वादात अडकतो आहे. 

आदित्य नारायणच्या ‘त्या’ संवादानंतर अमेय खोपकरांकडून कानउघडणी
Indian Idol 12 news

आदित्य नारायणच्या ‘त्या’ संवादानंतर अमेय खोपकरांकडून कानउघडणी

After Aditya Narayan's 'Tya' dialogue, Ameya Khopkar opened his ears

सध्या सोनी टीव्हीचा 'इंडियन आयडॉल 12 हा कार्यक्रम सतत काहीना काही कारणामुळे वादात अडकतो आहे. 

इंडियन आयडॉल 12 हा कार्यक्रम सतत काहीना काही कारणामुळे वादात अडकतो आहे. प्रेक्षकांकडूनही या कार्यक्रमावर मोठा आक्षेप घेतला जात आहे. इतर वाद सुरु असतानाच आता या शोचा होस्ट गायक आदित्य नारायण देखील मोठ्या वादात अडकला आहे.

या शोमध्ये एका स्पर्धकाशी बोलताना आदित्य नारायण याने ‘राग पट्टी ठीकसे दिया करो, हम अलिबागसे आये है क्या’ असे म्हटले होते. यावर आता समस्त अलिबागकरांनी आक्षेप घेत मनसेचे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर  यांच्याकडे तक्रारीदेखील केल्या

यानंतर आता अमेय खोपकर यांनी देखील आदित्य नारायण याच्या या वक्तव्यावर चांगलीच कान उघडणी केली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी आदित्यला आपल्या फेसबुक लाईव्ह सेशनमधून कडक शब्दांत त्याला समज देखील दिली आहे.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. या व्हिडीओत ते म्हणाले की, ‘आदित्य नारायण याच्या या वक्तव्याचा निषेध नक्कीच व्हायला पाहिजे. हिंदी वाहिनीवर असं सरळ म्हटलं जात. यांना अलिबागची संस्कृती माहीत नाही, यांना अलिबागची लोकं माहिती नाही. 

पुढे ते म्हणाले, ‘हा अलिबागकरांचा अपमान आहे. याचा आम्ही निषेध करतो. आताच माझं उदित नारायण यांच्याशी बोलणं झालं, मी त्यांना माझ्या भाषेत समजावले आहे. त्यांना हे देखील सांगितले की, हल्ली त्याच्या मुलाच्या आदित्यच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्याचा आगाऊपणा आणि उद्धटपणा वाढल्याच्या आणखी तक्रारी येत आहेत. अलिबागचा हा अपमान आम्ही सहन करणार नाही! मी वाहिनीशी देखील संपर्क साधला आहे.


पुढे अमेय खोपकर म्हणाले की, ‘आम्ही आता या हिंदीवाल्यांसाठी एक पत्रकच काढणार आहोत. पुन्हा ‘हम अलिबागसे आये है क्या’ असे वाक्य ऐकू येऊ नये. पुन्हा असं झालं तर यावेळी पत्रक नाही काढणार, फेसबुक लाईव्ह नाही करणार, सरळ कानाखाली आवाज काढणार. ही वेळ आता शुटींग बंद करण्याची नाही, त्यामुळे फेसबुक लाईव्हमधून समाज दिली आहे. मात्र, त्यांना माफी ही मागावीच लागेल. 

आम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही भागाचा अपमान सहन करणार नाही! आदित्य नारायणला अलिबागकरांची माफी मागायला लावणारच!’ अशा कडक शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.