ऊस तोडणी व वाहतूक कामगार यांच्या दरात वाढ करा - मोहन जाधव

राज्यातील उसतोडणी व वाहतुक कामगारांची मजुरी आणि मुकादांचे कमीशन वाढीसह अन्य सुविधा बाबतच्या ऑक्टोबर २०१५ मध्ये इ गलेल्या त्रिपक्षीय कराराची मुदत संपलेली आहे.

ऊस तोडणी व वाहतूक कामगार यांच्या दरात वाढ करा - मोहन जाधव
Increase the rates of sugarcane harvesters and transport workers - Mohan Jadhav

ऊस तोडणी व वाहतूक कामगार यांच्या दरात वाढ करा - मोहन जाधव

बीड : महाराष्ट्र उसतोडणी व वाहतुक कामगार संघटना (सीटु) बीड राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या तोडणीदवाढीचा व अन्य सुविधा नविन करार करणे यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी मार्फत साखर आयुक्त पुणे यांना निवेदन देण्यात. यावेळी मोहन जाधव यांच्यासोबत पाच सदस्य उपस्थित होते.
राज्यातील उसतोडणी व वाहतुक कामगारांची मजुरी आणि मुकादांचे कमीशन वाढीसह अन्य सुविधा बाबतच्या ऑक्टोबर २०१५ मध्ये इ गलेल्या त्रिपक्षीय कराराची मुदत संपलेली आहे. त्यामुळे सन २०२०-२१ चा गळीत हांगाम सुरु होण्यापुर्वी मजुरी वाढ आणि अन्य मागण्या संबंधीचा नवीन त्रिपक्षीय करार करण्याची गरज आहे.

मागण्या ऊस तोडणी व वाहतुक कामगारांसाठी सरकारने घोषीत केलेल्या महामंडळाचे कामकाज तातडीने सुरु करावे सन २०२०-२१ चा गळीत हंगाम सुरु होण्यापुर्वी उसतोड व वाहतुक कामगार, मुकादम, यांची नोंदणी करुन त्यांना ओळखपत्र व सेवापुस्तीका देण्यात याव्यात या महामंडाळासाठी निधी उभारण्यासाठी राज्यातील साखर उत्पादनात किंमतीच्या एक टक्का
इतका उपकर लागू करावा.उसतोडणी कामगाराचा तोडणीदर प्रतिटन ४०० रुपये करा, वाहतुक दरात वाढ करा आणि मुकादमाच्या कमिशन मध्ये ३५ टक्के वाढ करा. उसतोडणी व वाहतुकदार कामगारांचा तोडणी दराचा करार ५ वर्षा ऐवजी ३ वर्षोंचा करण्यात यावा. उसतोड, वाहतुकदार कामगारांचा विमा, वैद्यकिय सुविधा मुलामूलिसाठी व राह्माची व्यवस्था करा.

शिक्षाणाची सोय स्थलांतरीत कामगारांना कामावर जाताना महिन्याचे रेशन एकदाच द्या. उसतोडणी महिला कामगारांचे गर्भाशय कापुन टाकलेल्या उसतोड महिला कामगारांना प्रत्येकी ५ लाख नुकसान भरपाई द्या.

उसतोड कामगारासाठी कायदा करण्यात यावा. वरील मागण्या लवकर सोडवण्यात याव्यात अन्यथा  आंदोलन करण थेईल. यावेळी बीड जिल्हा कमिटीचे तथा राज्याचे नेते मोहन जाधव, विनायक चव्हाण, रोहिदास, जाधव, शिवाजी जाधव, सुरेश राठोड, डॉ धोत्रे कुंडलिक कॉम्रेड सुहास गायकवाड आदी उपस्थित होते.

बीड 

प्रतिनिधी -विश्वनाथ शरणांगत

___________

Also see :भाजपा महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्षपदी परेश गुजरे

https://www.theganimikava.com/Paresh-passed-away-as-the-Vice-President-of-BJP-Maharashtra-Pradesh-Yuva-Morcha