राज्यातील रामोशी बेरड समाज्याचा अनुसूचित जातीत समावेश करा...

मल्हार क्रांती संघटनेची मागणी तासगाव तहसीलदारांना निवेदन

राज्यातील रामोशी बेरड समाज्याचा अनुसूचित जातीत समावेश करा...
Include the Ramoshi Baird community of the state in the Scheduled Castes

राज्यातील रामोशी बेरड समाज्याचा अनुसूचित जातीत समावेश करा...

मल्हार क्रांती संघटनेची मागणी तासगाव तहसीलदारांना निवेदन

राज्यतल्या रामोशी,बेरड समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा व इतर मागण्यांचे निवेदन तासगाव तहसीलदार सौ . कल्पना ढवळे याना देण्यात आले.दौलत नाना शितोळे यांच्या आदेशाने जय मल्हार क्रांति संघटना तासगाव यांनी हे निवेदन दिले. जय मल्हार क्रांती संघटनेचे तासगाव तालुका अध्यक्ष विशाल जाधव यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात त्यांनी केलेल्या मागण्यामध्ये आधक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावे स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी,रामोशी ,बेरड,बेडर समाजाचा विकास आराखडा तयार करा,आधक्रांतीवर राजे उमाजी नाईक चित्रपटासाठी निधी देण्यात यावा,अध्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक व शूरवीर बहिर्जी नाईक यांचा पाठयपुस्तकांमध्ये संपूर्ण इतिहास समाविष्ट करावा. अध्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाचा निधी देण्यात यावा,शूरवीर बहिर्जी नाईक यांचे नाव गुहागर-विजापूर महामार्गाला देण्यात यावे.

रामोशी वतनी जमिनी बिनशर्त परत मिळाव्यात अश्या मागण्या केल्या आहेत.३१ ऑक्टोबरपर्यंत दखल न घेतल्यास २नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालये ,जिल्हाधिकारी कार्यालये, आमदार, खासदार व मंत्र्यांचे निवासस्थाना समोर जय मल्हार क्रांती संघटना बोंबाबोंब आंदोलन असा इशारा दिला आहे. यावेळी पै.लक्ष्मण मंडले  अध्यक्ष  जय मल्हार क्रांती संघटना,  सांगली जिल्हाअध्यक्ष,डाँ. विवेक गुरव,  अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी ,निमित्त शिरतोडे उपाध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना सांगली जिल्हा, धनंजय मदने बेंद्रीकर स्टार प्रचारक:जय मल्हार क्रांती संघटना सांगली जिल्हा  ,शहाजी मदने ,बाळासाहेब शिरतोडे,प्रणव शिरतोडे,रावसाहेब शिरतोडे,रामभाऊ मदने,दीपक जाधव,नवनाथ शिरतोडे व समाज बांधव उपस्थित होते.

सांगली

प्रतिनिधी - जगन्नाथ सकट

_______

Also see : 'नृत्यमय गणित' या विषयावर वेबिनार

https://www.theganimikava.com/Webinar-on-Dance-Mathematics