‘आय.एम.ई.डी.गेम्स महोत्सवचे’ उदघाटन

भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट’(आयएमईडी) मध्ये ‘गेम्स्-२०२०’ या स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे...

‘आय.एम.ई.डी.गेम्स महोत्सवचे’ उदघाटन
Inauguration of ‘IMED Games Festival’

‘आय.एम.ई.डी.गेम्स महोत्सवचे’ उदघाटन

पुणे : भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट’(आयएमईडी) मध्ये ‘गेम्स्-२०२०’ या स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.व्यवस्थापन शास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आय एम इ डी चे संचालक डॉ सचिन वेर्णेकर यांच्या हस्ते उदघाटन झाले. 

 ही स्पर्धा दिनांक १२ ते १४ ऑक्टोबर या दरम्यान  आयएमईडी ( पौड रोड कॅम्पस, कोथरुड ) येथे होत  आहे. महोत्सवातील सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्रक तसेच विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे.

या स्पर्धा महोत्सवामध्ये ‘वक्तृत्व स्पर्धा’, ‘अ‍ॅड मॅड शो’, ‘डेव्हलपिंग वेबसाईट’, ‘टेक्नो इव्हेंट’, ‘मुक्त निर्मिती क्षमता’, ‘माझे चित्र माझी गोष्ट’, ‘रांगोळी’, ‘सर्वोत्तम व्यवस्थापक’, ‘सर्वात्तम उद्योजक’, ‘प्लेमलेस कुकींग’, प्रश्नमंजूषा या स्पर्धांचा समावेश आहे.

पुणे
प्रतिनिधी - अशोक तिडके

___________

Also see : भिवंडीत दोन वर्षांत २६ बलात्कारांच्या घटनांतील ४ पीडितांची हत्या

https://www.theganimikava.com/Murder-of-4-victims-of-26-rape-cases-in-Bhiwandi-in-two-years