ठाणे शहरात कर्जदार व जामीनदार हक्क बचाव संघर्ष समितीच्या भीमनगर शाखेचे उद्घाटन.

भीमनगर,वर्तक नगर, ठाणे येथे  संघटनेचा फलक उद्घाटन सोहळा होत असताना प्रमुख पाहुणे मा.ॲड.प्रसाद करंदीकर साहेब यांचे स्वागत करताना जिल्हा संघटक धनाजी सुरोसे यांनी महात्मा जोतिबा फुले यांचे गुलामगिरी पुस्तक देऊन स्वागत केले.

ठाणे शहरात कर्जदार व जामीनदार हक्क बचाव संघर्ष समितीच्या भीमनगर शाखेचे उद्घाटन.
Inauguration of Bhimnagar branch of Borrowers and Bailiffs Rights Struggle Committee in Thane city
ठाणे शहरात कर्जदार व जामीनदार हक्क बचाव संघर्ष समितीच्या भीमनगर शाखेचे उद्घाटन.

ठाणे शहरात कर्जदार व जामीनदार हक्क बचाव संघर्ष समितीच्या भीमनगर शाखेचे उद्घाटन...

भीमनगर,वर्तक नगर, ठाणे येथे  संघटनेचा फलक उद्घाटन सोहळा होत असताना प्रमुख पाहुणे मा.ॲड.प्रसाद करंदीकर साहेब यांचे स्वागत करताना जिल्हा संघटक धनाजी सुरोसे यांनी महात्मा जोतिबा फुले यांचे गुलामगिरी पुस्तक देऊन स्वागत केले. त्यानंतर ॲड. करंदीकर आपले विचार मांडताना म्हणाले की, भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत आर्थिक समानतेसाठी, करूया संघर्ष शोषितांसाठी हा नारा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर कर्जदार व जामीनदार हक्क बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य पिडीत व्यक्तीला धीर देण्याचे कार्य करत आहे कर्ज घेणे हा गुन्हा नाही सरकारचे धोरणच असे आहे की, सर्वसामान्य व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा,आरोग्य,शिक्षण  ह्या मूलभूत गरजा  हक्क मिळायला  हव्यात मग त्या पूर्ण होत नसल्याकारणाने सर्वसामान्य व्यक्ती कर्ज घेतो परंतु काही बाजारातील व्यवसाईक अडचणी,सरकारची चूकीची धोरणे , नैसर्गिक आपत्तींमुळे कर्ज भरणे शक्य होत नाही. पण वीत्तीय संस्थांच्या बेकायदेशीरपणे चालवलेल्या कर्ज वसुलीसाठी लावलेला तगादा मानसिक त्रासाला कंटाळून शेवटी मनावर परिणाम  होणे नाही. तर आत्महत्या करणे हाच एक पर्याय म्हणून कर्जदार स्वीकारतो. अश्यावेळी कोणताच नेता, कार्यकर्ता, नातेवाईक मदतीला येत नाही पण जर आपण कर्जदार व जामीनदार हक्क बचाव संघर्ष समितीच्या कार्यकर्त्याला आवाज दिला तर नक्कीच आपल्याला मदत करण्यास पुढे येईल असे ॲड.करंदीकर म्हणाले. संघटनेचे  पदाधिकारी  मधुकर मोरे, अफाक अन्सारी,तुकाराम मालकर, सूरज शेडगे,संदीप कळसकर, कुणाल सुरोसे उपस्थित होते शेवटी प्रकाश कदम यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार  मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.

मुरबाड 

प्रतिनिधी - लक्ष्मण पवार

__________

Also see : खोडाळ्यात  कॅण्डल मार्च रॅलीचे आयोजन

https://www.theganimikava.com/candle-March-rally-in-Khodala