वाडा तालुक्यातील कुडूस विभागात जुन्या शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करून रवींद्र फाटक यांना दिले निवेदन 

पालघर उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील व वाडा तालुका प्रमुख उमेश पठारे यांच्या कार्यशैली वर जुन्या शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करुन त्यांच्या कारभारा विरोधात बंड ठोकून त्यांची तक्रार केली

वाडा तालुक्यातील कुडूस विभागात जुन्या शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करून रवींद्र फाटक यांना दिले निवेदन 
Letter to Ravindra Phatak, showing the displeasure in Kudus

वाडा तालुक्यातील कुडूस विभागात जुन्या शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करून रवींद्र फाटक यांना दिले निवेदन 

वाडा तालुक्यातील कुडूस विभाग हा कारखाने असल्याने महत्वपूर्ण मानला जातो याच विभागात शिवसेना पदाधीकारी यांनी पालघर उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील व वाडा तालुका प्रमुख उमेश पठारे यांच्या कार्यशैली वर जुन्या शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करुन त्यांच्या कारभारा विरोधात बंड ठोकून त्यांची तक्रार पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांना दि.5 ऑक्टोबर रोजी निवेदन देऊन त्यांना पदावरुन खाली करण्याची मागणी केली आहे.

        सदर वाडा तालुक्यातील शिवसेने मध्ये प्रचंड प्रमाणात गटबाजी बघायला मीळत आहे.त्यामध्ये जुने कट्टर शिवसैनिक व काही वर्षापूर्वी प्रवेश केलेले नवीन शिवसैनीक त्यांच्यात दोन गट निर्माण झाले आहेत.ही गटबाजी उफाळून आली ती कुडूस जिल्हा परिषद गटातील नियुक्त्या करताना.

         सदर या घटनेमुळे कुडूस विभागातील पदाधिकारी यांनी  संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांना निवेदन देऊन तक्रार केली आहे की तालुकाप्रमुख व उपजिल्हाप्रमुख यांनी तालुक्यामध्ये निवडणुका शिवाय आतापर्यंत कुठलाही संघटनात्मक काम तालुक्यामध्ये केलेले नाही.तसेच निष्ठावंत शिवसैनिकांना विश्वासात घेतले जाते नाही असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.त्याचबरोबर कुडूस विभागातील नियुक्त्या करताना आपल्या मर्जीतील लोकांना पद वाटप केले आहेत त्यामुळे अशा या दोन्ही पदाधिकाऱ्यांना या पदावरून दूर करा या संदर्भात निवेदन  देण्यात आले यावेळी भिवंडी ग्रा. विधानसभा संपर्क प्रमुख धनंजय पष्टे यासोबत कुडूस विभागातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

      " कुडूस विभागातील ज्या नियुक्त्या केल्या आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारे मतभेद न ठेवता व जुन्या लोकांची पद कमी न करता कार्य करणाऱ्या युवातरुणांना संधी दिली आहे.त्याचबरोबर ह्या नियुक्त्या करताना वरिष्ठांना विश्वासात घेऊन त्यांच्या आदेशानुसार केल्या आहेत.'"
- पालघर उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील

वाडा

प्रतिनिधी - जयेश घोडविंदे 

__________