मोबाईल दुकानावरही दरोडा, हजारोंचा मुद्देमाल लंपास

राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरु होता.

मोबाईल दुकानावरही दरोडा, हजारोंचा मुद्देमाल लंपास
Ichalkaranji police news

मोबाईल दुकानावरही दरोडा, हजारोंचा मुद्देमाल लंपास

राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरु होता. 

या काळात अत्यावश्यक सेवेतील दुकानानांच ठरवीक वेळेत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं बंदच होती. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांची रस्त्यावर फारशी वर्दळ नसायची. मध्यरात्री अनेक ठिकाणी रस्ते सामसूम असायचे. याच शांततेचा फायदा घेऊन इचलकरंजीत काही चोरट्यांनी मोबाईलचं दुकान फोडलं. (Robbery on mobile shop too, thousands of items looted)

गडमुडशिंगी येथील मोरया मोबाईल दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. त्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुकानात असतील तेवढे मोबाईल, कम्प्युटर आणि इतर साहित्यांवर डल्ला मारला. चोरट्यांनी जवळपास 79 हजारांचा माल लंपास केला. त्यांनी मध्यरात्री दुकानाचे कुलूप तोडून ही चोरी केली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी मोरया मोबाईल दुकान चालकाला या घटनेबाबत माहिती मिळाली. त्यांनी याबाबत माहिती मिळाली तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला. आधीच लॉकडाऊन आणि त्यात दुकानात चोरी झाल्याने ते निराश झाले. त्यांनी तातडीने गांधीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार केली. 

गांधीनगर पोलिसांनी प्रचंड मेहनत करुन अखेर संबंधित प्रकरणाचा छडा लावला. याप्रकरणी पोलिसांच्या हाती दोन संशयित आरोपी लागले. दत्तगुरु बचाराम कांबळे आणि नेहाल अबीत पाटील असं दोघांचं नाव आहे. हे दोघं आरोपी गडमुडशिंगी येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांची चौकशी करुन त्यांना अटक केलं. त्यानंतर या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं. (Robbery on mobile shop too, thousands of items looted

 गांधीनगर पोलिसांना आरोपींकडे चोरीच्या मुद्देमालासह चोरीची एक मोटारसायकलही मिळाली. त्यांनी लॉकडाऊनचा फायदा घेऊन या सगळ्या वस्तूंची चोरी केली होती.