जून महिन्यातील सीए फाऊंडेशन परीक्षेसाठी नोंदणी सुरु

इन्स्टिट्यूटऑफ चार्टड अकाउँटंट ऑफ इंडियानं सीए फाऊंडेशन जून परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. नोंदणीसाठीची अंतिम तारीख 4 मे आहे.

जून महिन्यातील सीए फाऊंडेशन परीक्षेसाठी नोंदणी सुरु
ICAI and CA EXAM

जून महिन्यातील सीए फाऊंडेशन परीक्षेसाठी नोंदणी सुरु

Registration begins for the CA Foundation exam in June

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउँटंट ऑफ इंडियानं  सीए फाऊंडेशन जून परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे.  नोंदणीसाठीची अंतिम तारीख 4 मे आहे.

इन्स्टिट्यूटऑफ चार्टड अकाउँटंट ऑफ इंडियानं  सीए फाऊंडेशन जून परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे.  नोंदणीसाठीची अंतिम तारीख 4 मे आहे.तर विलंब शुल्कासहीत अर्ज करण्याची शेवटची मुदत 7 मे पर्यंत आहे. ज्या विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे ते icaiexam.icai.org वेबसाईटवर भेट देऊन अर्ज करु शकतात. भारतातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे शुल्क 1500 रुपये तर परदेशी विद्यार्थ्यांसाठी 325 अमेरिकनं डॉलर इतकं शुल्क राहील. 

सीए फाऊंडेशन जून परीक्षा 2021  साठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 4 मे 2021 हा आहे. विलंब शुल्कासहीत अर्ज करण्याची तारीख 7 मे आहे. सीए फाऊंडेशन जून सत्राची परीक्षा 24 जून ते 30 जून पर्यंत चालेल. पेपर 1 आणि 2 दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत घेण्यात येईल. तर पेपर 3 आणि 4 दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत आयोजित केली जाणार आहे.

ICAI CA च्या जून मधील सत्राच्या परीक्षेला अर्ज करायचा असल्यास प्रथम आयसीएआयच्या अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.in या वेबसाईटला भेट द्या.
तिथे परीक्षार्थी नोंदणीवर क्लिक करा.
विद्यार्थ्यांनी अर्जातील सर्व माहिती अचूकपणे सादर करावी. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
परीक्षा फी जमा करावी आणि त्यानंतर अर्ज दाखल करावा.
अर्ज डाऊनलोडकरुन त्याची प्रिंटआऊट सोबत ठेवावी.
परीक्षेची फी भरण्यासाठी यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगचा वापर करावा.

आयसीएआय ही एक वैधानिक संस्था आहे. ही संस्था देशातील चार्टर्ड अकाउंटन्सीच्या व्यवसायाचे नियमन करण्यासाठी 1949 मधील सनदी लेखाकार कायद्याखाली स्थापन करण्यात आली होती. सध्या या संस्थेचे 3 लाखांहून अधिक सदस्य आहेत. सीए शिक्षणामध्ये उच्चतम दर्जा राखण्याची जबाबदारी आयसीएआयवर आहे. ज्या विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटन्सीचा व्यवसाय करायचा असेल, त्याने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा दिल्यानंतर आयसीएआयच्या फाऊंडेशन कोर्ससाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.

इच्छुक उमेदवार अंतिम मुदतीपूर्वी अधिकृत वेबसाईट icaiexams.icai.org वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

भारतीय केंद्रांतील उमेदवारांसाठी अर्ज फी 1500 रुपये आहे. काठमांडू वगळता इतर परदेशी केंद्रांसाठी फी 325 अमेरिकी डॉलर आहे. काठमांडू (नेपाळ) केंद्रांमधील उमेदवारांसाठी फी 2200 रुपये आहे.