अत्यावश्यक माहिती : कोरोनाच्या काळात बाजारातून आणलेला भाजीपाला कसा करावा सॅनिटाईज...!!

प्राणघातक करोना व्हायरसच्या (Coronavirus disease) वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. करोनामुळे देशभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यानं नागरिक पूर्वीपेक्षा आता अधिक सतर्क झाले आहेत. सरकार तसंच वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं काटेकोरपणे पालन केले जात आहे. जेणेकरून करोनाचा संसर्ग (COVID-19) रोखण्यास मदत होईल. खबरदारी म्हणून बाहेरून घरात आणल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूचं योग्य पद्धतीनं निर्जंतुकीकरण (Sanitize) केले गेले तर करोना व्हायरस पसरण्याचा धोका कमी होतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

अत्यावश्यक माहिती : कोरोनाच्या काळात बाजारातून आणलेला भाजीपाला कसा करावा सॅनिटाईज...!!
In pandemic of covid - 19 , some tips for how to sanitize vegetables...!! | theganimikava

सध्याच्या काळात सगळे चिंतीत आहे. या जीवघेण्या संक्रमणापासून सगळे आपआपल्यापरीने वाचण्याचा प्रयत्न करीत आहे. या साठी स्वच्छतेची काळजी सर्व घेतच आहे. त्यामुळेच आपणं संसर्गापासून वाचू शकतो. 

घराच्या आणि स्वतःच्या स्वच्छते बरोबरच खाण्यापिण्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. बाहेरून खाण्यापिण्याचे पाकीट तसेच भाज्या आणल्यावर त्यांना सेनेटाइज निर्जंतुक नाशक (sanitize)  करणे महत्त्वाचे आहे. कारण ह्या संसर्गाचे विषाणू कुठेही जाऊन बसतात.

दुधाचे पाकीट तर आपणं सेनेटाइज करू शकतो. पण भाज्यांबद्दल बोलायचे झाले तर त्यांना स्वच्छ करून आपल्या फ्रीजमध्ये ठेवावे. पण या भाज्यांना आपणं सेनेटाइज कसे करू शकतो. हे जाणून घेणे आवश्यक आहे. 

भाज्यांना सेनेटाइज करण्यासाठीचे काही खास टिप्स :

 • सर्वप्रथम पाणी गरम करून त्यामध्ये मीठ टाकावं. या मध्ये सर्व भाज्यांना टाकून धुऊन घ्यावे. नंतर नळाच्या पाण्याखाली अजून 1 वेळा स्वच्छ धुऊन टाकावे. त्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवावे.
 • पाण्यामध्ये 1 कप ऍपल सायडर व्हिनेगर आणि 1 चमचा मीठ घालावे. या पाण्याने सर्व भाज्या धुऊन घ्यावा. नंतर चांगल्या पाण्याने अजून 1 वेळा धुऊन घ्यावा.
 • पाण्यात बेकिंग सोडा आणि ऍपल व्हिनेगर टाकावे. या पाण्यात भाज्यांना चांगल्या प्रकाराने चोळून चोळून धुऊन घ्यावे. या नंतर गरम पाण्यात अजून 1 वेळा या भाज्यांना धुऊन घ्यावे.
 • गरम पाण्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि मीठ टाकावे. या पाण्यात भाज्यांना टाकून स्वच्छ करा. नंतर भाज्यांना नळाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे. 
 • गरम पाण्यात मीठ आणि व्हिनेगर टाका. ह्या मध्ये भाज्यांना टाकून चोळून चोळून धुवावे. नंतर या भाज्यांना स्वच्छ पाण्याने अजून 1 वेळा स्वच्छ धुऊन घ्यावे.   

अशा प्रकारे आपण भाज्यांनासुद्धा सेनेटाइज करू शकतो.

असा पसरतो करोना विषाणू :

 • शिंकताना किंवा खोकताना जे थेंब बाहेर पडतात, त्याद्वारे हा प्राणघातक आजार पसरतो.
 • तसंच आजूबाजूच्या पृष्ठभागावरही याचे थेंब पडतात. या पृष्ठभागास स्पर्श केल्यानंतरही करोना विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करतात.

करोनापासून बचाव करण्यासाठी ही देखील काळजी घ्या :

 • श्वसनाचे विकार असणाऱ्या व्यक्तीसोबत संपर्क ठेऊ नका.
 • संपर्क ठेवल्यास योग्य ती काळजी घ्या
 • हात वारंवार धुणे
 • शिंकताना, खोकताना, नाकातोंडावर रुमाल किंवा टिश्यू पेपर धरावा.
 • फळे, भाज्या न धुता खाणे टाळावे.

भाजीची पिशवी घरामध्ये आणू नका :

 • किराणा सामान आणण्यासाठी नेहमी नव्या पिशवीचाच वापर करावा. तसंच खरेदी करून झाल्यानंतर वापरलेली पिशवी घरामध्ये ठेवण्याची चूक करू नका.
 • महत्त्वाचे म्हणजे वाण सामानाची नेहमीची पिशवी वापरणं टाळा. करोना व्हायरसच्या संसर्गापासून स्वतःचा बचाव करायचा असल्यास ही गोष्ट कायम लक्षात ठेवा.
 • भाजीपाला, फळे घरी आणल्यानंतर वापरलेली पिशवी थेट कचऱ्याच्या डब्यात फेकून द्या. बाहेरून आणलेल्या पिशवीवर करोना व्हायरस असण्याची भीती आहे. अशा परिस्थिती जर तुम्ही वाण सामानासाठी वापरलेली पिशवी घरात ठेवल्यास करोना आजाराला तुम्ही आयते निमंत्रण देत आहात.

तुमचं स्वयंपाकघर स्वच्छ असणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे..

 • तुमचं स्वयंपाकघर देखील स्वच्छ ठेवणे तितकेच गरजेचं आहे. सिंक, भांडी घासण्याचे स्‍क्रबर, भाजी चिरण्याचे बोर्ड हे व्हिनेगरच्या मदतीनं स्वच्छ करा.
 • बाजारातून भाजीपाला आणल्यानंतर ज्या-ज्या वस्तूंना तुम्ही स्पर्श केला आहे, त्या-त्या वस्तू स्वच्छ करण्यास विसरू नका किंवा टाळू नका.
 • ज्याप्रमाणे स्वयंपाकघरातील भांडी घासायचा स्क्रब किंवा स्पॉंज वेळच्या वेळी बदलणं जसं गरजेचं आहे. तसे भाजी चिरण्याचा बोर्डही बदलला गेला पाहिजे. कारण या बोर्डचा वापर सर्वाधिक होतो.
 • आपण दररोज भाजी चिरण्याचा बोर्ड कितीही चांगल्या प्रकारे स्वच्छ धुऊन ठेवत असलो तरीही त्याला जंतू चिकटलेले असतात. म्हणून चॉपिंग बोर्ड दर तीन महिन्यांनी बदलणं आवश्यक आहे.

वरील लेखनामध्ये तुम्हाला कोरोना या भीषण परिणाम स्वतःची काळजी आणि स्वरक्षण कसे करायचे यासाठी थोडक्यात टिप्स देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा... धन्यवाद...

टीप - ह्या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सर्वसाधारण  माहिती वर आधारित आहे. The Ganimikava ह्याची पुष्टी करत नाही. ह्याची अंमलबजावणी करण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्यावा.