पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती सुधारणेसाठी कल्याण पूर्वेत होम हवन

शिवसेना नेते आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली...

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती सुधारणेसाठी कल्याण पूर्वेत होम हवन

कल्याण (kalyan) : शिवसेना नेते आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी व दीर्घायुष्यासाठी कल्याण पूर्वेत नगरसेवक महेश गायकवाड यांच्या वतीने साईयाग होम हवन करण्यात आले.

कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून नागरिकांना आरोग्य सुविधा आणि इतर जीवनावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे दिवसरात्र कार्यरत आहेत. अशातच जनतेची सेवा करतांना एकनाथ शिंदे कोरोना बाधित झाले आहेत.  

सामान्य नागरिकांसाठी झटणाऱ्या नेत्याला कोरोनाची लागण झाल्याने, त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी व दीर्घायुष्य लाभावे यासाठी कल्याण पूर्वेतील नगरसेवक महेश गायकवाड यांनी साईयाग होमहवनाचे आयोजन केले होते. 

यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे परिवहन समिती सभापती मनोज चौधरी, कल्याण पूर्व सहसंपर्क प्रमुख  शरद पाटील, माजी नगरसेवक शरद पावशे, विभागप्रमुख सुभाष गायकवाड,  प्रशांत बोटे आदी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कल्याण, ठाणे 
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

_______

Also see : श्री.संजोगभाऊ वाघेरे व आमदार आण्णा बनसोडे यांच्या  शुभहस्ते झोपडपट्टीचे पुनर्वसन भुमिपुजन संपन्न...

https://www.theganimikava.com/Bhumi-Pujan-rehabilitation-of-Slum-under-SRA-at-Ward-No-21-Pimpri-completed