पूर्वोत्तर राज्यांसाठीचा भाजपचा प्लान काय ?

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या हिमंत बिस्व सरमा यांना भाजपने थेट मुख्यमंत्रिपद दिलं आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

पूर्वोत्तर राज्यांसाठीचा भाजपचा प्लान काय ?
Himanta Biswa Sarma news

पूर्वोत्तर राज्यांसाठीचा भाजपचा प्लान काय ?

What is the BJP's plan for the northeastern states

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या हिमंत बिस्व सरमा यांना भाजपने थेट मुख्यमंत्रिपद दिलं आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सरमा यांना मुख्यमंत्रिपद देण्यामागचं भाजपचं नेमकं गणित काय आहे? सरमा यांच्याकडे आसामची सूत्रे देण्यामागे भाजपचा नवा प्लान काय आहे? या प्रश्नांचा घेतलेला हा आढावा.

सरमा यावेळी राजकारणाची गरज आहे. सर्बानंद सोनोवाल यांनीही मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम केलं आहे. म्हणूनच सत्ता राखल्या गेली आहे, असं भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं. 2016च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून दिल्याबद्दल आणि 2019मध्ये संपूर्ण नॉर्थ-ईस्टमध्ये भाजपचं नेतृत्व केल्याने सरमा यांना पक्षाने त्यांना मुख्यमंत्रिपदाची बक्षिसी दिली आहे.

आसाममध्ये एनडीएची सत्ता आणून देण्यास सरमा यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपद देऊन पूर्वोत्तर राज्यांवर पकड मजबूत ठेवण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. तसेच पूर्वेकडील इतर राज्यांमधील नेत्यांमध्ये त्यांचं महत्त्व मोठं आहे, असं या भाजप नेत्याने सांगितलं.

सोनोवाल यांना केंद्रात मंत्रिपद मिळू शकतं, असंही त्यांनी सांगितलं. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रंजीत कुमार दास यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं जाऊ शकतं. केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली यांच्या जागी त्यांची वर्णी लागू शकते.

2016मध्ये मुख्यमंत्री बनण्याआधी सर्बानंद सोनोवाल हे केंद्रात स्किल डेव्हल्पमेंट राज्य मंत्री होते. त्याशिवाय त्यांच्याकडे क्रीडा आणि युवा कल्याण मंत्रालयाचा प्रभारही होता. पक्षात 60 आमदारांपैकी 42 आमदारांचा सरमांना पाठिंबा असल्याचं भाजप हायकमांडला माहीत होतं. आमदारांच्या एका गटाने सरमा यांना पाठिंबा असल्याचं एक पत्रंही केंद्रीय नेतृत्वाला लिहिलं होतं.

त्यामुळे पक्षातील बंड थोपवलं जावं आणि आसाममध्ये स्थैर्य निर्माण व्हावं म्हणून भाजपने सरमा यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवलं. आसाममध्ये गेल्या अनेक वर्षापासून आसामच्या पूर्वकडील नेत्याकडेच आसामचं मुख्यमंत्रिपद आलं आहे. मात्र, पहिल्यांदाच सरमा यांच्या निमित्ताने आसामच्या पश्चिमेकडील व्यक्तीकडे राज्याचं मुख्यमंत्रिपद गेलं आहे.

सोनोवाल यांनी आसामच्या पूर्वेकडून अधिकाधिक आमदार निवडून आणले. त्यामुळे सरमा पश्चिम भागात सर्वाधिक आमदार निवडून आणतील असा आम्हाला विश्वास आहे, असं भाजपचे आमदार बिनोद हजारिका यांनी सांगितलं. सरमा हे काँग्रेसच्या तरुण गोगोई सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. मात्र, गोगोईंसोबत वाद झाल्याने त्यांनी 2014मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.

आसाममधील भाजपचा कट्टर चेहरा म्हणून सरमा यांची ओळख निर्माण झाली आहे. तसेच सरमा यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही पाठिंबा दिला आहे.