महामार्गावरील जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद

लोकांना धाक दाखवून त्यांचे जवळील नगदी रुपये, मोबाईल व सोन्याचे दागिने अशा लुटमारीच्या चोरी करणाऱ्या टोळीला बीड पोलिसांनी केले जेरबंद

महामार्गावरील जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद
Highway robbery gang nabbed

महामार्गावरील जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद

दिनांक 30/09/2020 रोजी फिर्यादी नामे दिलीप मधुकर उबाळे वय 42 वर्षे रा.वसंतराव नाईक कॉलेज समोर, नांदेड यांचे फिर्यादवरुन पोलीस स्टेशन अंमळनेर येथे गु.र.नं.230/2020 कलम 392, 34 भा.दं.वि.प्रमाणे दाखल झाला होता. तसेच काही दिवसांपासून बीड शहराचे बाहय भागात वॉकींगसाठी जाणारे एकांतातील लोकांना धाक दाखवून त्यांचे जवळील नगदी रुपये, मोबाईल व सोन्याचे दागिने अशा लुटमारीच्या घटना घडल्या होत्या, सदरचे गुन्हे (03) अज्ञात आरोपींनी केले असल्याचे माहिती फिर्यादी कडून मिळाली होती. सदरची बाब गंभीरतेने घेवून मा.पोलीस अधीक्षक साहेब, बीड यांनी वरील घटनेतील आरोपींना तात्काळ जेरबंद करणे बाबतचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.

 दिनांक 06/10/2020 रोजी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.श्री.एकीलवाले व त्यांची टिम आरोपीचे शोधकामी बीड शहर व परिसरात पेट्रोलींग करीत असतांना त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सराईत गुन्हेगार नामे श्रावण गणपत पवार व त्याचे दोन साथीदार रामा अमृतराव साळुके व सय्यद जावेद सय्यद जाफर सर्व रा.नवगण राजुरी ता.जि.बीड यांना त्यांचेकडील होंडा शाईन मो.सा.क्र. MH-12-HG-2403 व चोरीचे (34) मोबाईलसह ताब्यात घेतले. त्यांना अधिक विश्वासात घेवून विचारपुस करता त्यांनी सांगीतले की, आम्ही सर्वांनी 5 - 6 दिवसांपूर्वी डोंगरकिन्ही ते चुंबळी जाणारे रोडवरील घाटात वाहने आडवून वाहनातील लोकांकडून चोरी केल्याचे सांगीतले, तसेच बीड शहराचे बाहय भागातील इतर ठिकाणी चोरी केल्याचे सांगीतले. त्यांचेकडून चोरीचे एकूण ( 34 ) मोबाईल हॅन्डसेट व गुन्हयात वापरलेली मो.सा.क्र. MH-12 HG-2403 असा एकूण 3,88,000 /- रु. चा मुद्येमाल ताब्यात घेतला. चौकशीअंती वरील आरोपीचा पोलीस स्टेशन, अंमळनेर गुरनं 230/2020 कलम 392,34 भादंवि व पो.स्टे.बीड ग्रामीण गुरनं 320/2020 कलम 392,34 भादंवि या गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने जप्त मुद्येमालासह आरोपीना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन, अंमळनेर येथे हजर केले आहे. गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि.डोंगरे, पो.स्टे.अंमळनेर हे करीत आहेत. सदर आरोपीकडून अशा प्रकारचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. वरील गुन्हयातील चोरलेल्या मुद्येमाला बाबत व त्यांनी केलेल्या आणखीन गुन्हयाबाबत तपास चालू आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, बीडचे पो.नि.भारत राऊत, पो.नि.रविंद्र गायकवाड, सायबर सेल, स्था.गु शा.चे स.पो.नि. आनंद कांगुणे, पो.उप.नि.गोविंद एकीलवाले, पोलीस कर्मचारी तुळशीराम जगताप, शेख सलीम बालाजी दराडे, रविंद्र गोले, श्रीमंत उबाळे, मनोज वाघ, विकास वाघमारे, राहूल शिदे, प्रसाद कदम, कैलास ठोंबरे, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, युनूस बागवान, सखाराम पवार, नरेंद्र बांगर, विकी सुरवसे चालक अतुल हराळे, संतोष हारके यांनी केलेली आहे.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत 

_____