हाथरस : बलात्कार व अमानुष अत्याचार प्रकरणातील दोषींना तात्काळ शिघ्र न्यायालयामध्ये खटला चालवून दोषींना जाहीरपणे फासावर लटकवा - युथ पँथर संघटना -नितीन सोनवणे

उत्तर प्रदेश येथील वाढत्या जाती अत्याचाराच्या घटना रोखण्यात सरकारला पुर्णतः अपयश आलेले आहे..

हाथरस : बलात्कार व अमानुष अत्याचार प्रकरणातील दोषींना तात्काळ शिघ्र न्यायालयामध्ये खटला चालवून दोषींना जाहीरपणे फासावर लटकवा - युथ पँथर संघटना -नितीन सोनवणे
Hathras: The perpetrators of rape and inhumane atrocities should be brought to justice in a speedy court - Youth Panther Organization - Nitin Sonawane

हाथरस : बलात्कार व अमानुष अत्याचार प्रकरणातील दोषींना तात्काळ शिघ्र न्यायालयामध्ये खटला चालवून दोषींना जाहीरपणे फासावर लटकवा - युथ पँथर संघटना -नितीन सोनवणे
     

उत्तर प्रदेश येथील वाढत्या जाती अत्याचाराच्या घटना रोखण्यात सरकारला पुर्णतः अपयश आलेले आहे. किंबहुना दलितांवर अत्याचार करणार्या आरोपींना सरकार पाठीशी घालत असुन “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” ब्रिद च्या विरूध्द “खलरक्षणाय सदनिग्रहणाय” काम करत असल्याचे चित्र उत्तर प्रदेश मध्ये पहायला दिसत असुन संपूर्ण भारत देशामध्ये एक संतापाची लाट उसळताना दिसत असल्याची बोचक टीका युथ पॅंथर चे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष मा. भाऊसाहेब कांबळे यांनी बिजेपी सरकारवर केली आहे. तसेच या घटनांवर आवाज उठवणाऱ्या राजकीय व सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकारांवर उत्तर प्रदेश सरकार दडपण आणत असुन गंभीर स्वरुपाची गुन्हे दाखल करत त्यांच्यावरच अटकेची कारवाई करत आहे. उत्तर प्रदेश योगी आदित्यनाथ यांचे सरकार बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी आंदोलनाद्वारे निदर्शने करत युथ पॅंथर ने राष्ट्रपती राम नाथ कोंविद यांच्याकडे केली आहे.
            हाथरस येथील बलात्कार व अमानुष अत्याचार प्रकरणातील दोषींचा खटला शिघ्र न्यायालयात चालविण्यात यावा. व दोषीना जगजाहीर पध्दतीने सर्व मिडीयाच्या / जनतेच्या समोर जाहीर प्रेक्षपणासह फासावर लटकवण्यात यावे. आणी या प्रकरणात ज्या अधीकार्यांनी गुन्हा होण्यापूर्वी कर्तव्यात हलगर्जीपना केला आहे. अशा पोलीस प्रशासनातील अधीकार्यांवर देखील वरील अत्याचार व बलात्कार समक्ष गुन्हे दाखल करून त्यांना देखील  शिक्षा देण्यात यावी . तसेच अश्याप्रकारे ज्या ज्या कुटूंबामध्ये अन्याय अत्याचार होतील , अशा कुटूंबातील व्यक्तींना शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे. तसेच अशा कुटूंबाना राजकीय आरक्षणाचे प्रावधान देखील करण्यात यावे. तसेच अनुसुचित जाती व जमातीवर होणारे अन्याय अत्याचार प्रतिबंध कायदे अधीक कडक करण्यात यावे.
     तसेच देशात, राज्यात सुरू असलेल्या जातीय अत्याचाराविरोधात सरकारणे कठोरात कठोर पाऊले उचलून प्रशासनास देखील तत्पर कार्य करण्यास निर्बंध घालावेत.पोलीस प्रशासनाची मानसिकता व गुन्हेगारी तसेच गुन्हेगारांचा त्यांचा वरदहस्त या सर्व बाबींवर विचार होणे देखील आगत्याचे आहे. कारण आज समाजामध्ये ज्या वाईट गोष्टी घडत आहेत, कारण प्रशासणाचा कुठला धाक, अंकुश राहीलेला नाही. वरील अत्याचाराचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे...! जेणेकरून असे प्रकार भविष्यात घडणार नाहीत.
        याकरिता तात्काळ कार्यवाही करावी. युथ पॅंथर संघटनेनी संपूर्ण महाराष्ट्रामधून प्रत्येक जिल्हा तालुका मधून निवेदने देऊन आंदोलनाद्वारे संताप व्यक्त करत निषेध नोंदवण्यात आले आहे.
             अमरावती, औरंगाबाद, लातुर, उस्मानाबाद, बिड,मुंबई . येथुन झालेल्या निदर्शनाच्या आंदोलनामध्ये युथ पॅंथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे, राष्ट्रीय संघटक अमोलजी सोनटक्के, सचिव देवेंद्र कांबळे, सरचिटणीस सिध्दार्थ कांबळे, ज्ञानेश्वर माळी, विदर्भ महीला संघटक नंदाताई राऊत, मराठवाडा महीला अध्यक्षा अनिता नरवाडे अमरावती जिल्हा अध्यक्ष शरिफ भाई शेख, मंगलसिंह ठाकुर, अतिफ उमेर, अमरावती महीला जिल्हा अध्यक्षा सुषमाताई मोरे, तसेच सर्व जिल्हा कार्यकारीणी, - औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष सचिन बागुल, शहर अध्यक्ष राज बनकर सह औरंगाबाद जिल्हा कार्यकारीणी, बिड जिल्हा अध्यक्ष नितीन सोनवने सह जिल्हा कार्यकारीणी, -लातुर, जिल्हा अध्यक्ष अविनाश सुर्यवंशी कार्यअध्यक्ष विकी गवारे सह जिल्हा कार्यकारीणी, निलंगा तालुका अध्यक्ष अभय गायकवाड, प्रसाद कांबळे सह तालुका कार्यकारीणी, उदगीर तालुका अध्यक्ष सुनिल कांबळे सह तालुका कार्यकारणी, -उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष आनंद कांबळे सह कार्यकारीणी.इ.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

_____________

Also see :उत्तरप्रदेश मधील हाथरस घटनेच्या निषेधार्थ पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचा पक्षाच्या मुख्यालयासमोर सत्याग्रह

https://www.theganimikava.com/Satyagraha-of-Palghar-District-Congress-Committee-in-front-of-the-party-chief-to-protest-the-Hathras-incident-in-Uttar-Pradesh