मराठा समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास फाशी द्या......

अल्पवयीन शाळकरी चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस फाशी होण्यासाठी गृहमंत्र्यांना भेटणार - वैभव गिते

मराठा समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास फाशी द्या......
Hang the man who raped a minor girl in the Maratha community
मराठा समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास फाशी द्या......
मराठा समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास फाशी द्या......
मराठा समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास फाशी द्या......

मराठा समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास फाशी द्या......

अल्पवयीन शाळकरी चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस फाशी होण्यासाठी गृहमंत्र्यांना भेटणार -वैभव गिते

अहमदपूर : कालिदास ईश्वर ताकवणे रा.पारगाव (सालू-मालू) ता.दौंड याने फरसान खाण्याच्या बहाण्याने मराठा समाजातील अल्पवयीन इयत्ता 6 वी मधील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला आहे. ही चिमुकली अजून घरी का येत नाही म्हणून पीडित मुलीची आई व आज्जी मुलीचा शोध घेत होते तेवढ्यात मुलीचा ओरडण्याचा व रडत असल्याचा आवाज ऐकू आला पीडिताने तिच्यासोबत घडलेली सर्व घटना आज्जीला सांगितली याबाबत मुलीची आजी यांनी यवत जि.पुणे या पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्याने भा.द वि 376 व बाललैंगिक अत्याचार अधिनियम (पोस्को ॲक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे यवत पोलीस स्टेशनचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कापुरे यांनी आरोपीस तात्काळ अटक करून महत्वपूर्ण पुरावा प्राप्त केला आहे. या घटनेची माहिती नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीसचे पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक दादा जाधव यांना मिळताच त्यांनी एन.डी.एम.जे संघटनेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांना सर्व हकीकत सांगितली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक दादासाहेब जाधव. एम.डी. एम. जे पुणे जिल्हा निरिक्षक पांडुरंग गडेकर,प्रकाश पारदासानी. यशवंत वाघोले अमर जोगदंड. गावचे ग्रा प सदस्य ज्ञानेश्वर साबळे पोलिस मित्र रमेशजी चितारे यांनी पारगाव (सालू-मालू)या गावात पीडित कुटुंबांच्या घरी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले.

घटनेची संपूर्ण माहिती घेतली कुटुंबाने व पीडित मुलीने सांगितलेली घटना ऐकताच राज्य सचिव वैभव गिते यांनी घटनास्थळावरूनच सर्व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना कडक कारवाई साठी फोन वरून चर्चा केली. पोलीस अधिकारी यांनी कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले याप्रकरणी एक बाब अधोरेखित झाली ती म्हणजे अल्पवयीन इयत्ता सहावी मधील मराठा समाजातील शाळकरी मुलीवर मराठा समाजातील लिंगपीसाट समाजाला कलंक असणाऱ्याने बलात्कार केला तरीसुद्धा एकही मराठा संघटनांनी या मराठा समाजातील पीडित कुटुंबास मदत केली नाही साधा निषेधही नोंदवला नाही परंतु नेहमीप्रमाणे कर्तव्यदक्ष एन.डी.एम.जे टीम ने या कुटुंबास शेवटपर्यंत मदत करण्याचे आश्वासन दिले आहे दौंड शहरातील दादासाहेब जाधव व पांडुरंग गाडेकर यांनी पीडित कुटुंबास आधार दिला लवकरच *राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व राज्य महिला आयोगाची  भेट घेणार असल्याचे राज्याचे नेते वैभव गिते साहेबांनी सांगितले तसेच योग्य कार्यवाही न झाल्यास आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र सचिव दादासाहेब जाधव यांनी प्रसार माध्यमांना दिली.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत 

_________

Also see : मित्तल परिवार, लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंडतर्फे जीतो कोविड सेंटरला व्हेंटिलेटर भेट

https://www.theganimikava.com/By-Mittal-Parivar-Lions-Club-of-Poona-Ganeshkhind