अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेवर मार्गदर्शन
रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट चा उपक्रम...

अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेवर मार्गदर्शन
रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट चा उपक्रम
पुणे : कोविड विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल आणि बेकरीतील अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्याच्या उपक्रमास गुरुवारी आझम कॅम्पस येथील 'बेकर्स कॉर्नर ' येथे प्रारंभ करण्यात आला. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या 'एम ए रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट' च्या वतीने आयोजित या उपक्रमात प्रा .इम्रान सय्यद,प्रा. पुनीत बसान यांनी मार्गदर्शन केले. फूड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑफ इंडिया च्या सूचनांची माहिती देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
पुणे
प्रतिनिधी - अशोक तिडके
______________
Also see : बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची फौज सज्ज...