सरसेनापती हरजीराजे महाडीक यांना अभिवादन
हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हरजीराजे महाडीक यांना ३३१ व्या स्मृतिदिनानिमित्त स्वराज्यनिष्ठ सरसेनापती हरजीराजे महाडिक सेवा समिती ,मावळा जवान संघटनेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले...

सरसेनापती हरजीराजे महाडीक यांना अभिवादन
पुणे (Pune): हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हरजीराजे महाडीक यांना ३३१ व्या स्मृतिदिनानिमित्त स्वराज्यनिष्ठ सरसेनापती हरजीराजे महाडिक सेवा समिती ,मावळा जवान संघटनेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
सिंहगडाच्या पायथ्याच्या पानशेत रस्त्यावरील निगडेमोसे येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिल्पसृष्टीतील सरसेनापती हरजीराजे महाडीक यांच्या स्मारकाची इतिहास संशोधक व स्वराज्य रक्षक संभाजी मालीकेचे सल्लागार दत्ताजी नलावडे यांच्या हस्ते पारंपारीक पुजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. सेवा समितीचे अध्यक्ष प्रविणसिंह राजेमहाडिक ,चंद्रकांत महाडिक, मावळा जवान संघटनेचे संघटक रोहित नलावडे, सुरेश ढेबे, गंगाराम जगताप ,बाळासाहेब जगताप आदी सहभागी झाले होते.
राष्ट्रभक्तीचा महिमा :
स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून प्रसिध्द असलेल्या दक्षिणेतील जिंजी किल्ला व स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी हरजीराजे महाडीक यांनी अतुलनीय शौर्य गाजविले. बलाढ्य मोघल शत्रूशी लढताना 29 मार्च 1689 रोजी हरजीराजे महाडीक यांनी बलिदान दिले. प्रखर राष्ट्रभक्तीचा महिमा जिवंत करणारे स्वराजनिष्ठ हरजीराजे महाडीक यांचे राज्यातील तसेच देशातील पहिले स्मारक निगडेमोसे येथील शिवशंभू स्मारक शिल्पसृष्टीत उभारण्यात आले आहे.
पुणे
प्रतिनिधी - अशोक तिडके
__________
Also see : लॉकडाऊन काळातील उल्लेखनीय कार्याचा गौरव
https://www.theganimikava.com/The-glory-of-the-remarkable-work-of-the-lockdown-period