शहापूर तालुक्यातील पत्रकारांसाठी शासनाने राखीव बेड उपलब्ध करून  पत्रकारांना ५० लाखाचे विमा कवच देण्याची मागणी

संघर्ष पत्रकार संघ ठाणे जिल्हा तर्फे मागणी.....

शहापूर तालुक्यातील पत्रकारांसाठी शासनाने राखीव बेड उपलब्ध करून  पत्रकारांना ५० लाखाचे विमा कवच देण्याची मागणी
Government demands to provide reserved beds for journalists in Shahapur taluka and provide insurance cover of Rs 50 lakh to journalists.

शहापूर तालुक्यातील पत्रकारांसाठी शासनाने राखीव बेड उपलब्ध करून  पत्रकारांना ५० लाखाचे विमा कवच देण्याची मागणी

संघर्ष पत्रकार संघ ठाणे जिल्हा तर्फे मागणी

      ठाणे (thane) जिल्ह्यासह शहापूर तालुक्यात  मोठ्या प्रमाणावर कोरोना 
(corona) बाधित रूग्णांची संख्या वाढत असून दिवसेंदिवस सापडणाऱ्या कोरोना (corona) बाधित रूग्णामुळे शहापूर तालुक्यातील कोविड सेंटर (covid centre) व खाजगी  दवाखान्यातील बेड फुल झाले आहेत. कोरोना (corona) सारख्या महाभयंकर महामारीच्या संसर्गजन्य साथीत पत्रकार बांधव समाजातील घडणाऱ्या विविध बातम्या ह्या जिवीत धोक्यात घालून पोहचवत असतो.मागील काही दिवसांपूर्वी पुण्याचे टिव्ही ९ वृत्तवाहिनेचे पाडुरंग रायकर यांना प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे आपला जिव गमवावा लागला.

कोरोनाच्या (corona) काळात जर एखाद्या पत्रकाराला कोरोनाची (corona) लागण झाली तर तात्काळ उपचार घेण्यात यावे यासाठी शासनाकडून व आपत्ती व्यवस्थापन कमिटी ठाणे यांच्या कडून शहापूर  तालुक्यातील पत्रकारांना कोविड सेंटरमध्ये (covid centre) ऑक्सिजन बेड सह व्हेंटिलेटर राखीव ठेवण्यात यावेत.

तसेच  तालुक्यातील पत्रकारांना सरसकट विमा कवच देऊन पत्रकाराचा कोरोनामुळे दुर्देवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुंटूबाला ५० लाख रुपयांचा निधी जाहिर करण्यात यावा  या दोन्ही मागण्या संघर्ष पत्रकार संघ ठाणे जिल्हा च्या वतीने करण्यात आल्या आहेत.

शहापूर तालुक्यात १०० पेक्षा अधिक पत्रकार बांधव  दैनिक , साप्ताहिक , इलेक्ट्रॉनिक मीडिया , सोशल मीडिया या माध्यमातून  बातम्यांचे अपडेट जनतेपर्यंत  पोहचवत आहेत. कोरोना महामारी रोगाची  जनजागृती बातम्यांच्या माध्यमातून करत आहेत. शहापूर तालुक्यातील कोरोना चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढत असल्याने वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना याची लागण होण्याची  शक्यता आहे.  शहापूर तालुक्यातील  कोविड सेंटर ची क्षमता कमी असल्याने ते फुल होत आहे. तर खाजगी दवाखान्यात सुद्धा बेड फुल असून या साठी लागणारा खर्च पत्रकारांना परवडणारा नाही.  त्यानुसार आगामी काळात या महामारी चा धोका लक्षात घेता तालुक्यातील पत्रकारांसाठी आक्सिजन बेड सह व्हेंटिलेटर सुविधा असणारे बेड  राखीव ठेऊन  सरसकट सर्व पत्रकारांना ५० लाखाचे विमा कवच द्यावे अशी मागणी संघर्ष पत्रकार संघाचे  ठाणे जिल्हा अध्यक्ष योगेश हजारे यांनी केली आहे.

शहापूर

प्रतिनिधी - शेखर पवार

_______

 

Also see : एन.आर.सी. शाळेतील क्वारंटाइन सेंटर त्वरित सुरु करण्याची भा.ज.यु.मोर्चाची मागणी

https://www.theganimikava.com/BJP-demands-immediate-start-of-quarantine-center-in-NRC-schools