ब्रेड बेकिंग स्पर्धेस चांगला प्रतिसाद
महाराष्ट्र कॉस्मॉपॉालिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ने आयोजित केलेल्या ऑनलाईन ब्रेड बेकिंग स्पर्धेस शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला.
ब्रेड बेकिंग स्पर्धेस चांगला प्रतिसाद
पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉालिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ने आयोजित केलेल्या ऑनलाईन ब्रेड बेकिंग स्पर्धेस शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला. हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांनी जगभरातील विविध प्रकारचे ब्रेड तयार करून स्पर्धेत भाग घेतला. वरीष्ठ गटात उझ्मा मुल्ला यांचा प्रथम, साक्षी पाटसकर यांचा द्वीतिय,समीक्षा काळे यांचा तृतीय क्रमांक आला. कनिष्ठ गटात कौसर शेख, अनस पटेल, सिमरनजित सिंह विजयी ठरले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
पुणे
प्रतिनिधी - अशोक तिडके
_________
Also see : नृत्याचा अंकांशी जवळचा संबंध:सुचेता भिडे-चापेकर