गोव्यातील मृत्यूतांडवानंतर मुख्यमंत्री बदलाची मागणी

ऑक्सिजन टँकरसाठी प्रशिक्षित ड्रायव्हर जर कोल्हापूरमधून आणावे लागत असतील तर मुख्यमंत्रीही कोल्हापुरातूनच आणावा.

गोव्यातील मृत्यूतांडवानंतर मुख्यमंत्री बदलाची मागणी
Goa corona update

गोव्यातील मृत्यूतांडवानंतर मुख्यमंत्री बदलाची मागणी

Demand for change of CM after death in Goa

ऑक्सिजन टँकरसाठी प्रशिक्षित ड्रायव्हर जर कोल्हापूरमधून आणावे लागत असतील तर मुख्यमंत्रीही कोल्हापुरातूनच आणावा.

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गोव्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा सातत्याने वाढत असल्यामुळे आता राज्य सरकारला हादरे बसायला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यातील अंतर्गत कलह समोर आला होता. त्यानंतर आता विरोधकांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेऊन संपूर्ण कारभार टास्क फोर्सच्या हाती द्यावा, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी केली. गोव्यात शनिवारी पहाटे ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे आणखी 13 जणांचा मृत्यू झाला.

प्राणवायूअभावी आजपर्यंत 83 रुग्णांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना धारेवर धरले.ऑक्सिजनअभावी रुग्णांच्या होणाऱ्या मृत्यूसाठी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्रीच जबाबदार आहेत. गोवा सरकार पैसे कमवणे आणि उधळण्यात व्यस्त आहे.

मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये कोणताही समन्वय उरलेला नाही. ऑक्सिजन टँकरसाठी प्रशिक्षित ड्रायव्हर जर कोल्हापूरमधून आणावे लागत असतील तर मुख्यमंत्रीही कोल्हापुरातूनच आणावा, अशी खोचक टिप्पणी विजय सरदेसाई यांनी केली.


व्यात ऑक्सिजनअभावी  मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. इथे दररोज श्वास गुदमरुन अनेकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे गोव्यात  मृत्यूचं  तांडव आहे. सलग चौथ्या दिवशी ऑक्सिजनअभावी 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात  गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवारी पहाटे सहा वाजेपर्यंत आणखी 13 कोरोना रूग्णांचा तडफडून मृत्यू झाला. प्राणवायूअभावी आजपर्यंत 83 रुग्णांचा बळी गेला आहे. उच्च न्यायालयाने याच विषयावर सरकारला फटकारले असूनही रुग्ण दगावण्याचे सत्र सुरुच आहे. 

गोव्यात आतापर्यंत एकूण 2 हजारच्या जवळपास कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ऑक्सिजनअभावी झालेल्या मृतांचा आकडा भयावह आहे.गोव्यात आतापर्यंत एकूण 2 हजारच्या जवळपास कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ऑक्सिजनअभावी झालेल्या मृतांचा आकडा भयावह आहे.

प्रशिक्षित ट्रॅक्टर ड्रायव्हर नसल्यामुळे सिलिंडर वाहतूक गोवा मेडिकल कॉलेज रुग्णालयात करण्यास व्यत्यय येत आहे. सरकारने कोल्हापूरहून 8 प्रशिक्षित ड्रायव्हर मिळवले आहेत. दोन अतिरिक्त हायपावर ट्रॅक्टर उपलब्ध करण्यात आले आहेत.

महामारी काळात शववाहिका दुप्पट आणि कधीकधी तिप्पट दर आकारत असल्याचा मुद्दा न्यायालयात उपस्थित झाला होता. या दोन्ही सेवेतील ऑपरेटर्सवर निर्बंध घालण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.

3. केंद्राकडून मिळालेल्या 323 ऑक्सिजन कांसनट्रेटर्स पैकी 263 गोवा मेडिकल कॉलेज रुग्णालय, फोंडा येथील आयडी इस्पितळ येथे 30, म्हापसा येथील आझिलो इस्पितळात 20 तर डिचोली येथील केशव सेवा साधना संस्थेच्या केंद्रात 10 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स पुरविल्याचे सरकारने म्हटले आहे.

घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठीही रिकामे सिलेंडर भरून देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे आहे.