वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा ऑनलाईन शिक्षणाला  फटका

भाजप नगरसेविका मनीषा धात्रक यांनी व्यक्त केली नाराजी....

वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा ऑनलाईन शिक्षणाला  फटका
Frequent power outages hit online education

वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा ऑनलाईन शिक्षणाला फटका   

भाजप नगरसेविका मनीषा धात्रक यांनी व्यक्त केली नाराजी

कल्याण : वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा फटका ऑनलाईन शिक्षणाला बसत असून महावितरणच्या या अनागोंदी कारभाराबाबत भाजप (bjp) नगरसेविका मनीषा धात्रक यांनी नाराजी व्यक्त करत निवेदन दिले आहे.

कोरोना काळात सर्व शाळा –महाविद्यालये बंद असल्याने राज्य शासनाने ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरु केले. त्यामुळे शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचे वर्ग सुरु ठेवले. हे शिक्षण घरात बसून मोबाईलचा वापर केला जातो. मात्र यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते. परंतु अनेक दिवसांपासून डोंबिवलीत वीज पुरवठा खंडित होत असल्याने याचा परिणाम ऑनलाईन शिक्षणावर होत आहे. ऑनलाईन शिक्षणातील खंडीत वीज पुरवठ्यामुळे उद्भवलेल्या समस्येकडे भाजप (bjp) नगसेविका मनीषा धात्रक यांनी लक्ष वेधले असून महावितरण कंपनीच्या डोंबिवली विभागाला पत्र देऊन नाराजी व्यक्त केली आहे.

सरकारचा ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रम सध्याच्या परिस्थितीत अतिशय योग्य असला तरी वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत धात्रक यांनी  महावितरण कंपनीच्या डोंबिवली विभागाला वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत निवेदन दिले आहे.

कल्याण, ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

________

Also see : टाटा आमंत्रा कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांच्या जेवणात अळ्या, केडीएमसीचा भोंगळपणा चव्हाट्यावर

https://www.theganimikava.com/KDMC-larvae-on-patients-meals-at-Tata-Amantra-Covid-Center